साऊथ स्टार धनुष आणि ऐश्वर्या यांचं 18 वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे. 18 वर्षांचं नात संपल्याचं आज धनुषने ट्विटरवरून जाहीर केलं. दोघांचं एक जॉईंट स्टेटमेंट समोर आलं. दोघांच्या या अचानक आलेल्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र धनुष आणि ऐश्वर्या यांच्या निकटवर्तीयांना याचं काही आश्चर्य वाटलेलं नाही.
ADVERTISEMENT
दोघांनी आपल्या वाटा बदलण्याचा निर्णय का घेतला? याप्रकरणी धनुषच्या जवळच्या मित्राशी इंडिया टुडेने संवाद साधला. त्याने हे सांगितलं धनुष हा प्रचंड काम करणारा आणि वर्कहॉलिक माणूस आहे. कोणत्याही गोष्टीपेक्षा धनुष कामाला महत्त्व देतो. अनेकदा असंही झालं आहे की धनुष त्याच्या कामानिमित्त विविध शहरांमध्ये प्रवास करतो. आऊटडोअर शूटिंग्स असल्याने तो कुटुंबीयांपासून दूर राहतो. त्याच्या कामामुळे तो कुटुंबाला फार वेळ देऊ शकत नाही. धनुष आणि ऐश्वर्या यांच्यात जेव्हा खटके उडत तेव्हा धनुष एक नवा सिनेमा साईन करत असे. त्यामुळे तो स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत असे.
धनुष हा एक अंतर्मुख राहणारा माणूस आहे. आपल्या जवळच्या मित्रांशीही तो फार चर्चा करत नाही. धनुषच्या मनात काय सुरू आहे ते सांगता येणं कठीण आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांच्यात जेव्हा काही तणाव निर्माण व्हायचा तेव्हा धनुष सिनेमा साईन करत असे. आपल्या अपयशी नात्यातून बाहेर पडण्यासाठी धनुष जास्तीत जास्त काम करणं पसंत करत होता.
या सगळ्यामुळे कुटुंबावर गहीरा परिणाम झाला आहे. गेल्या सहा महिन्यात या दोघांमधला तणाव जास्त वाढला होता. धनुषने ओटीटी स्पेस आणि इतर नव्या प्रोजेक्टमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. याचाच अर्थ की वेगळं होण्याचं दोघांच्या मनात कधीपासूनच सुरु होतं. धनुष आणि ऐश्वर्या यांच्यात डिव्होर्सचं संयुक्त लेटर पोस्ट करण्याआधी बरीच चर्चा झाली. अतरंगी रे या सिनेमाचं प्रमोशन झाल्यानंतर धनुष हा निर्णय जाहीर करू इच्छित होता. त्यामुळे आज जाहीर करण्यात आला. त्याच्या एका जवळच्या मित्राने सांगितलं की तो व्यक्तिगत पातळीवर निराश झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं. ऐश्वर्याने स्वतःला बिझी ठेवण्यासाठी फिटनेस, चॅरिटी यासारखे मार्ग निवडले.
धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या पर्सनल स्पेसला जास्त महत्त्व दिलं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये दरी निर्माण झाली आहे हे उघड होतं. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना या घटस्फोटाचा निर्णय घेतला त्याचं आश्चर्य वाटलं नाही.
मानसोपचार तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सीमा हिंगोरानी म्हणाल्या की सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्यावर त्यांच्या कामाचा आणि राहणीमानाचा दबाव असतो. लग्न झाल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या असतील की आपलं नातं फार पुढे जाऊ शकत नसेल तरीही ते जाहीर कसं करायचं? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया येतील? लोक काय म्हणतील? या सगळ्या गोष्टींचाही तणाव या सेलिब्रिटींवर असतो. सेलिब्रिटींचे विवाह, त्यांचं वैवाहिक आयुष्य हे व्यक्तीगत पातळीवर कितीही सारखेच किंवा एकसुरी असले तरीही नातं संपतं आहे किंवा निराश झालो आहोत हे कुणालाही सांगण्याचा ताण त्यांच्यावर असतोच. शिवाय सेलिब्रिटी म्हणून वावरताना आपलं स्टारडम जपण्याचंही प्रेशर त्यांच्यावर असतं. त्या सगळ्यामुळे अशा काही गोष्टी लवकर बाहेर पडत नाहीत.
जेव्हा सेलिब्रिटीज असा विचार करू लागतात की आपलं नातं आता फार काळ ओढत नेण्यात अर्थ नाही किंवा आपण आता ते यापुढे ओढू शकत नाही तेव्हा ते घटस्फोटासारखा निर्णय घेतात. शेवटी सेलिब्रिटी त्यांना समाजाने केलेलं असलं तरीही ती सामान्य माणसंच असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण सेलिब्रिटींच्या बाबतीतही लागू पडते असंही मानसोपचार तज्ज्ञ सीमा यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT