Sudden heart attack reasons : देशात हृदय विकाराच्या (heart attack) झटक्यामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. दर दिवशी एक-दोन घटना या घडतच असतात. तसेच याआधी 60 वर्षांच्या वयोगटातील नागरीकांना हृदय विकाराचा झटका यायचा, पण आता 25 ते 30 वयोगटातील तरूणांना देखील येतोय.त्यामुळे हृदय विकाराच्या झटका येणाऱ्या नागरीकांमध्ये वाढ होत चालली आहे.यामध्ये सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे अचानक हार्ट अटॅक येणे. त्यामुळे अचानक हार्ट अटॅक (heart attack causes) येण्याची लक्षणे काय आहेत? तसेच त्यावर उपचार काय आहेत, हे जाणून घेऊयात. (why does a sudden heart attack occur? know the details of symptoms and treatment)
ADVERTISEMENT
लक्षणे काय?
डायबिटीज, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्राल सारखे आजार हृदय रोगांना आमंत्रण देतात. यासोबत एथेरोस्क्लेरोसिस देखील अशी अवस्था आहे.ज्यामध्ये नागरीकांना अचानक हार्ट अॅटक येतो. यामध्ये हृदयाच्या धमन्यांमध्ये कडकपणा येतो आणि रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे नंतर हृदयविकाराचा झटका येतो.
एथेरोस्क्लेरोसिसचा आठ पट धोका
डेन्मार्कमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे. जर एखाद्या व्यक्तीला एथेरोस्क्लेरोसिस असेल तर त्याला हृदयविकाराचा धोका आठ पटीने जास्त असतो.एथेरो म्हणजे फॅट आणि स्क्लेरोसिस म्हणजे जमा होणे. जर हृद्याच्या धमन्यांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल जमा होत असेल तर त्या प्रक्रियेला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. एथेरोस्क्लेरोसिस जर लिवरमध्ये असेल तर लिवर निकामी आणि किडनीमध्ये असेल तर किडनी निकामी होते. यातील विशेष बाब म्हणजे, या रोगातील लक्षणे पटकन कळून येत नाही. असंख्य रूग्णांना या आजाराची माहिती देखील नसते.
धक्कादायक अहवाल
अनेक नागरीकांना एथेरोस्क्लेरोसिसचा आजार कमी वयातच होतो. मात्र त्यांना या आजाराची लक्षणे दिसूनच येत नाही, आणि त्यांना हार्ट अटॅक येतो, असे एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात सांगितले गेले आहे.
डेनमार्कच्या कोपेनहेगनमध्ये संशोधकांनी 9 हजार नागरीकांचे संशोधन केले होते.या संशोधनात 40 हून अधिक वयोगटातील नागरीक होते. या नागरीकांना हृदयासंबंधित कोणताच आजार नव्हता पण त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता होती. संशोधकांनी नागरीकांच्या हृदय आणि धमन्यांची कंप्युटेड टोमोग्राफी एंजिओग्राफीद्वारे एक्सरे काढला होता. या एक्सरेमध्ये 46 टक्के नागरीकांमध्ये सबक्लिनिकल कोरोनरी एथेरोस्क्लेरोसिसचे लक्षणे दिसले. यामध्ये सबक्लिनिकल म्हणजे रूग्णांमध्ये कोणतीही लक्षण न दिसणे असा अर्थ होतो.
ADVERTISEMENT