हर्षदा परब: देशात सोमवारी एका दिवसात जगातलं विक्रमी लसीकरण झालं. रात्री अकरा वाजेपर्यंत 85 लाख व्यक्तींचं लसीकरण करण्यात आलं. मात्र, महाराष्ट्रात यादिवशी मध्य प्रदेशच्या तुलनेत लसीकरण कमी झाल्याचं आढळलं. त्यावर महाराष्ट्रात लसीकरण कमी होण्यासाठी लसीची पुरेसा साठा उपलब्ध नसणे हे कारण असल्याची माहिती राज्याच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. दिलिप पाटील यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
देशात सोमवारी एका दिवसात 85 लाख लोकांच लसीकरण झालं. जगात एका दिवसात विक्रमी लसीकरण भारतात झालेलं असताना महाराष्ट्रात मात्र इतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या तुलनेत, महाराष्ट्रात लसीकरण कमी झाल्याचं आढळलं. देशात महाराष्ट्रात लसीकरणाची सर्वाधिक क्षमता असूनही या दिवशी लसीकरण असून महाराष्ट्रात सोमवारी 3 लाख 82 हजार 721 जणांचं लसीकरण झालं आहे. मध्य प्रदेशमध्ये 16 लाख 1 हजार 548 व्यक्तींचं लसीकरण झालं. उत्तर प्रदेशमध्ये 6 लाख 90 हजार 894 जणांचं राजस्थानमध्ये 4 लाख 30 हजार 439 जणांचं लसीकरण झालंय. पश्चिम बंगालमध्ये 3 लाख 17 हजार 991 लोकांचं लसीकरण झालंय.
राज्याच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. दिलिप पाटील यांना राज्यात लसीकरण कमी का झालं याबाबत विचारलं असता ते म्हणाले, “राज्यात कोव्हॅक्सिन लसीचा केवळ दुसरा डोस देण्यात येतोय. तर कोव्हिशिल्ड लसीचा केवळ दुसरा डोस देण्याला प्राधान्य देण्यात येतंय. याचं कारण लसीचा साठा आहे. कोव्हिशिल्ड लसीचा साठा असेपर्यंत त्याचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येईल.” राज्यात 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू झालेलं नाही, मंगळवारपासून 18 वर्षांवरील नागरीकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर यात वाढ होईल अशी माहितीही डॉ. पाटील यांनी दिली. तसंच, केंद्राकडून साठा येण्यावरही लसीकरण अवलंबून असल्याने केंद्राकडून साठा आल्यावर लसीकरण सुरळीत ठेवता येईल असं पाटील यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT