कल्याणमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अनेकदा बलात्कार केला. जेव्हा महिलेनं लग्नाबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं तिला धमकावलं आणि मारहाणही केली. महिलेनं या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कोळसेवाडी परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीचे नाव राम नारायण गुप्ता असं आहे, पीडितेच्या जीन्स पँट पॅकिंग व्यवसायात तो भागीदार होता. पीडितेच्या पतीच्या मृत्यूनंतर आरोपीने महिलेशी जवळीक वाढवली. त्यानं आधी महिलेशी गोड बोलून तिला फसवलं, तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला.
हे ही वाचा >> Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरण: तरुणीसोबत नेमकं काय घडलं? कोर्टातील A टू Z युक्तिवाद!
आरोपीकडून हे सगळं जवळपास सहा वर्ष सुरू होतं. जेव्हा महिलेने आरोपीशी लग्न करण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यानं टाळाटाळ करणारी उत्तरं दिली आणि कारणं सांगितले, असा आरोप महिलेने केला आहे. असाही आरोप आहे की आरोपीने महिलेला फक्त मानसिक त्रासच नाही, तर तिला धमकी देऊन आणि मारहाण करून वारंवार बलात्कार केला.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडचा हत्येत सहभाग, चार्जशीटमध्ये खळबळजनक आरोप
जेव्हा महिलेला हे सहन झालं नाही, तेव्हा तिने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी राम नारायण गुप्ताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
