महिला रिक्षाचालकाकडे शरीर संबंधासाठी मुलींची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये समोर आला आहे. ही मागणी करणारा शिवसेनेचा स्थानिक कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारानंतर महिला रिक्षाचालकाने भररस्त्यात या शिवसैनिकाला चपलेने बडवून काढलं आहे.
ADVERTISEMENT
जितू खाडे असं या शिवसैनिकाचं नाव असून तो विरारमध्ये शिवसेनेच्या विभाग प्रमुख पदावर काम करत असल्याचं कळतंय. जितू खाडेने महिला रिक्षाचालकाकडे शरिर संबंधासाठी मुली पाठवण्याची मागणी केली. ही मागणी ऐकताच संतापलेल्या रिक्षा चालकाने गुरुवारी दुपारी भररस्त्यात या शिवसैनिकाला चांगलाच चोप दिला.
धक्कादायक ! पतीला डांबून गुंडाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपीची धिंड
या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आरोपीने काही काळानंतर घटनास्थळावरुन पोबारा केल्यानंतर महिला रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्थानिक महिला रिक्षाचालकांकडून संताप व्यक्त होतो आहे.
सावत्र आईसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्राची हत्या; बोरिवली-कांदिवली रेल्वे रुळावर सापडला मृतदेह
ADVERTISEMENT