Mazi Ladki Bahin Yojana: काय म्हणता.. लाडकी बहीणमुळे महिला होणार कोट्याधीश? फक्त 'ते' पैसे...

मुंबई तक

27 Aug 2024 (अपडेटेड: 27 Aug 2024, 02:23 PM)

Ladaki Bahin Yojana Latest News: राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना मिळाला आहे. मध्य प्रदेशमध्ये लागू झालेल्या या योजनेचा गाजावाजा आता महाराष्ट्रातही होत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत.

Ladaki Bahin Yojana Latest News

Ladaki Bahin Yojana Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

'अशी' करा लाडक्या बहीण योजनेच्या पैशांची गुंतवणूक

point

लाडक्या बहीण योजनेच्या पैशांच्या माध्यमातून महिला होणार कोट्याधीश?

point

लाडक्या बहीण योजनेबाबत CM शिंदेंनी केली मोठी घोषणा

Ladaki Bahin Yojana Latest News: राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना मिळाला आहे. मध्य प्रदेशमध्ये लागू झालेल्या या योजनेचा गाजावाजा आता महाराष्ट्रातही होत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. या योजनेसोबतच महिलांना दरवर्षी 3 एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला कशाप्रकारे कोट्याधीश होऊ शकतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana launched by the state government. This scheme, which was implemented in Madhya Pradesh, is now happening in Maharashtra as well. Through this scheme, the government is depositing Rs 1500 per month in women's accounts)

हे वाचलं का?

CM एकनाथ शिंदेंनी केला आग्रह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतच म्हटलं होतं की, "ज्या बहिणींनी योजनेसाठी अजूनही अर्ज केला नाही, त्यांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. ज्यामुळे मागील तीन महिन्यांचे 4500 रपये सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होतील". ही योजना 2025 पर्यंत सुरु राहील, अशी माहिती आहे. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की, पुढील आर्थिक संकल्पात योजनेसाठी तरतूद केली जाईल. 

हे ही वाचा >> लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार ४००० रुपये? CM शिंदेंनी ठेवली एक अट

प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये वाचवा आणि...

सरकारकडून प्रत्येक महिन्याला मिळालेल्या 1500 रुपयांच्या माध्यमातून राज्यातील महिला कोट्याधीश होऊ शकतात. त्यासाठी महिलांना छोटासं काम करावं लागणार आहे. जर महिलांनी प्रत्येक महिन्याला 1000 रुपये म्यूच्युअल फंडमध्ये एसआयपी (SIP) केल्यास 10 वर्षांनी 12 टक्के रिटर्नसह त्यांना जवळपास 2,32 लाख रुपये मिळू शकतात. तर 15 टक्के रिटर्नसह ही रक्कम जवळपास 2.76 लाख रुपये होऊ शकते. म्यूच्युअल फंडच्या अनेक गुंतवणूकीत रिटर्न 18 टक्क्यांपर्यंत राहतं. असं झालं तर तुमची रक्कम जवळपास 3.36 लाख रुपये होण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा >> THAR नव्हे, आनंद महिंद्रांनी थेट विमानच बनवलं, VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले

ही योजना महिलांना करणार कोट्याधीश

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातूनच तुम्ही कोट्याधीश होऊ शकता, ही माहिती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. यासाठी तुम्हाला 40 वर्षांपर्यंत एसआयपी सुरु ठेवावी लागेल. यानुसार हिशोब केला तर 1000 रुपयांची एसआयपी 40 वर्षांपर्यंत केल्यावर जवळपास 1.18 कोटी रुपये मिळू शकतात. हा हिशोब 12 टक्के रिटर्नच्या आधारावर केला आहे. जर रिटर्नची टक्केवारी अधिक असेल, तर या रक्कमेत आणखी वाढ होईल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्षांची वयोमयार्दा आहे. 
 

    follow whatsapp