World Heart Day : तरूणांमध्ये काय उद्भवते हृदयरोगाची समस्या? काय असतात कारणं?

मुंबई तक

• 10:55 AM • 29 Sep 2021

डॉ. रमाकांत पांडा आज World Heart Day अर्थात जागतिक हृदयरोग दिवस आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की तरूणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण का वाढतं आहे. त्याचा प्रतिबंध करायचा असेल तर काय उपाय योजना आहेत. तरूणांमध्ये प्रामुख्याने हृदयरोगाचे कोणते प्रकार जाणवतात? 1) 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या तरूणांचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू […]

Mumbaitak
follow google news

डॉ. रमाकांत पांडा

हे वाचलं का?

आज World Heart Day अर्थात जागतिक हृदयरोग दिवस आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की तरूणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण का वाढतं आहे. त्याचा प्रतिबंध करायचा असेल तर काय उपाय योजना आहेत.

तरूणांमध्ये प्रामुख्याने हृदयरोगाचे कोणते प्रकार जाणवतात?

1) 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या तरूणांचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू होता. अनेकदा हृदयाच्या न दिसलेल्या दोषांमुळे किंवा हृदयाच्या दोषांकडे दुर्लक्ष केल्याने हे घडू शकतं. मात्र ही शक्यता तशी कमी असते. खास करून अचानक मृत्यू होण्याचं प्रमाण हे फिजिकल अॅक्टिव्हिटी दरम्यान होतं. व्यायाम किंवा मैदानी खेळ खेळताना ही घटना घडू शकते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयरोग जडण्याचं प्रमाण अधिक असतं.

2) दुसरा प्रकार हा तरूणांच्या दैनंदिन आयुष्याशी ज्याला आपण लाईफस्टाईल असं म्हणतो त्याच्याशी संबंधित आहे. जीवनशैली किंवा ज्याला Life style म्हणतो तो आज काल चिंतेचा विषय होऊ लागला आहे. त्यामुळे हृदयविकार जडू शकतात. याबाबत विविध प्रकारे अभ्यास सुरू आहेत.

सामान्यतः हे दोन प्रकार असताना आता कोव्हिडने आपल्याला तिसऱ्या प्रकाराची ओळख करून दिली आहे. एशियन हार्ट इन्स्टिट्युट मुंबई या ठिकाणी ऑगस्ट 2021 या महिन्यात एक 28 वर्षांचा तरूण आला. त्याला छातीत दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची तक्रार होती. कोव्हिडनंतर हृदय विकार जडल्याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणून या तरूणाकडे पाहता येईल. या मुलाला हृदय विकाराचा झटका आला होता. त्याच्यावर उपचार करून त्याचे रक्त पातळ करण्यात आलं. मात्र त्याच्या छातीत रक्ताची गुठळी तयार झाली होती, जी रक्त पातळ केल्याने विरघळली. त्याच्या अँजिओग्रामध्येही फार काही कंपनं जाणवली नाहीत मात्र हा एक हार्ट अटॅक होता. त्याला रूग्णालयात यायला उशीर झाला असता तर? त्याचं रक्त पातळ झालं नसतं तर? या प्रश्नांचा फक्त विचार करून बघा.

युवकांमधील हृदय रोगाचं आकलन आणि हा रोग समजून घेण्यासाठी केलेल्या पाच स्टडिज काय सांगतात पाहू?

1) युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी (ऑगस्ट 2021) तरूण, प्रौढ या वयोगटात मद्याचं सेवन अधिक प्रमाणात झाल्यास वृद्धत्व लवकर येतं. या अभ्यासात असंही मत नोंदवण्यात आलं आहे की पौगंड अवस्थेपासून एखादी व्यक्ती तरूणपणापर्यंत मद्याचे सेवन करत असेल तर त्याच्या धमन्या निबर होतात. जी हृदयरोग जडण्याची सुरुवात असू शकते.

सध्याच्या घडीला तरूणांमध्ये दारूचं सेवन, सिगरेट ओढणे या सगळ्या गोष्टी सामान्यतः दिसून येतात. याचेच दीर्घकालीन परीणाम होऊ शकतात. अल्कोहोलजन्य पदार्थांच्या जाहिरातींचा प्रभाव, कौटुंबिक बॅकग्राऊंड (कुटुंबात दारू पिण्याची कुणाला सवय असल्यास) तरूण या व्यसनांकडे वळू शकतात. त्याचा परीणाम त्यांच्या हृदयावर होणार आहे याची जाणीवही त्यांना त्यावेळी होत नाही. मात्र यातूनच स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका अशा गोष्टी उद्भवू शकतात.

2) कार्डिया स्टडी (ऑगस्ट 2021) मिनेसोटा स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ युनिव्हर्सिटीतील 18 ते 30 या वयोगटातील 4946 प्रौढांच्या कोरोनरी आर्टरी रिस्क डेव्हलपमेंट इन यंग अडल्टसमध्ये नोंदणी केली. चांगला आहार, योग्य आणि संतुलित आहार यांना हार्ट अटॅक किंवा हृदयरोगा होण्याची शक्यता ही पुढील तीस वर्षांसाठी 52 टक्क्यांनी कमी झाली. हा अहवाल अमेरिकन हार्ट असोसिएट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

3) अमेरिकन हार्ट इन्स्टिट्यूट स्टडी (एप्रिल 2021): हा स्टडी लठ्ठपणामुळे हृदयरोगाचा वाढलेला धोका दर्शवितो. मोबाईल पाहणे, टिव्ही पाहणे, बसून राहणे या सगळ्या कारणांमुळे जगातल्या 49 टक्के लोकांपैकी 39 टक्के लोक लठ्ठ झाले आहेत. त्यांना झोपेचे विकार, डिसलिपिडेमिया, टाइप 2 मधुमेह किंवा उच्च रक्तदाब होऊ शकतो असं मत या स्टडीमध्ये नोंदवण्यात आलं आहे. हा अभ्यास आधुनिक काळातील चुकीच्या दैनंदिन सवयीवर प्रकाश टाकतो, कदाचित कोरोना साथीच्या काळात आजार वाढला असेल असंही या स्टडीत स्पष्ट कऱण्यात आलं आहे.

4) अल्बर्टा विद्यापीठाचा स्टडी (मार्च 2021): प्राध्यापक स्पेन्सर प्रॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या चमूने तरुणांमध्ये भविष्यातील हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका मोजण्यासाठी एक नवीन, अधिक प्रभावी मार्ग शोधला. एखाद्या व्यक्तीने अन्न घेतल्यानंतर त्याचं शरीर किती कोलस्ट्रॉल तयार करतं या अनुषंगाने हा स्टडी करण्यात आला. ज्या व्यक्ती लठ्ठ होत्या त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होण्याचं प्रमाण जास्त दिसून आलं. अशा व्यक्तींना म्हणजेच चरबी जास्त असलेल्या व्यक्तींना हृदयरोगाचा धोका जास्त प्रमाणात असतो हे हा स्टडी सांगतो.

5) नेचर स्टडी (ऑक्टोबर 2020) हा अभ्यासपूर्ण लेख जन्मजात हृदयरोग असण्याबाबत भाष्य करतो. Congenital Heart Disease म्हणजेच CHD असणाऱ्या रूग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक असतं. हृदयविकार त्यांना जन्मजात असतो त्यामुळे त्याचा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे हे हा स्टडी सांगतो.

तर आपण पाहिलं की जगभरातले विविध अभ्यास हृदयविकारा बाबत काय सांगत आहेत. बैठी जीवनशैली हा यातला एक मुख्य घटक दिसतो आहे. अशावेळी सृदृढ हृदयासाठी काळझी घ्या. आपल्या जीवनशैलीत बदल करा आणि निरोगी जगा.

(डॉ. रमाकांता पांडा हे प्रमुख cardiovascular thoracic surgeon आहेत तसंच एशियन हार्ट इन्स्टिट्युट मुंबईचे ते एमडीही आहेत)

    follow whatsapp