ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अखेरीस अटकेत

मुंबई तक

• 08:39 AM • 23 May 2021

बिजींग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकाची कमाई करुन देणारा पैलवान सुशील कुमारला अखेरीस आज अटक करण्यात आली आहे. ४ मे रोजी दिल्लीत छत्रसाल स्टेडीयमवर पैलवानांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय सागर राणा या पैलवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सुशील आणि त्याच्या काही सहकारी मल्लांवर सागर आणि इतर मल्लांना मारहाण केल्याचा आरोप होता. दिल्ली पोलिसांनी […]

Mumbaitak
follow google news

बिजींग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकाची कमाई करुन देणारा पैलवान सुशील कुमारला अखेरीस आज अटक करण्यात आली आहे. ४ मे रोजी दिल्लीत छत्रसाल स्टेडीयमवर पैलवानांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय सागर राणा या पैलवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सुशील आणि त्याच्या काही सहकारी मल्लांवर सागर आणि इतर मल्लांना मारहाण केल्याचा आरोप होता. दिल्ली पोलिसांनी रविवारी सकाळी सुशील कुमार आणि त्याचा सहकारी अजय कुमारला अटक केली आहे.

हे वाचलं का?

सागर राणाच्या मृत्यूनंतर सुशील कुमारविरोधात अजामिनपात्र वॉरंट जाहीर करण्यात आलं होतं. अटक टाळण्यासाठी सुशील काही दिवस फरार होता, त्याने न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला…परंतू न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सुशील कुमारला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली होती. ACP अत्तारसिंग, इन्स्पेक्टर शिवकुमार, इन्स्पेक्टर करमबीर यांच्या पथकाने सुशीलविरोधात कारवाई केली आहे. सुशील आणि अजय स्कुटरवरुन कोणालातरी भेटायला जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

४ मे रोजी काय घडलं होतं छत्रसाल स्टेडीयममध्ये?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार, अजय, प्रिन्स, सोनू, सागर राणा, अमित या मल्लांमध्ये पार्किंग एरियात वादाला सुरुवात झाली. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं, ज्या मारहाणीमध्ये सागर राणाला आपला जीव गमवावा लागला.

दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारविरोधात हत्या, अपहरण आणि हत्येचा कट आखणे या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या FIR मध्ये आपलं नाव आल्यानंतर सुशील कुमार फरार होता. सुरुवातीला तो हरिद्वार, ऋषिकेश यासारख्या भागात होता, ज्यानंतर तो पोलिसांना चकवा देण्यासाठी हरियणात आपली ठिकाणं वारंवार बदल होता. परंतू न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर सुशीलसमोरचा शेवटचा पर्यायही संपला आणि दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.

    follow whatsapp