मुलीच्या वादातून तरूणाला ८ ते १० जणांनी केली मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
ADVERTISEMENT
नालासोपाऱ्यात मुलीच्या वादातून एका तरुणाला ८ ते १० जणांच्या जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर परिसरात ही घटना घडली असून मारहाण करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
सोनू पटेल असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो राहत असलेल्या परिसरातील एका मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते मात्र मुलीच्या कुटुंबियांना ते पसंत नव्हते त्यामुळे या वादातून मुलीच्या भावाने व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून त्याला ठोशा बुक्क्यांनी आणि लाकडी फळीने जबर मारहाण केली.. तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणी ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू
काय आहे प्रकरण?
सोनू पटेल याची त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीशी जवळीक वाढली. त्यांचं हे एकत्र येणं हे मुलीच्या घरातल्यांना मान्य नव्हतं. एकदा ही मुलगी घर सोडून सोनूच्या घरी राहायला गेली. त्यानंतर काही दिवसांनी ही मुलगी तिच्या घरी परत आली. आता ही मुलगी पुन्हा घर सोडून गेल्यामुळे तिच्या घरातल्यांना पुन्हा एकदा सोनूचा संशय आला. त्यामुळेच सोनूला गाठून या मुलीच्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी माराहण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.या प्रकरणी सुमारे सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT