गेल्या काही दिवसांत सांगली शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. अनेकांचा संसार या पुरात उध्वस्त झाला. परंतू या खडतर परिस्थितीतही एका नवरदेवाने चक्क पुराच्या पाण्यात बोटीतून आपली वरात काढली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
ADVERTISEMENT
रोहित सूर्यवंशी या तरुणाचा विवाहसोहळा ठरला होता. परंतू पुराने सर्व आयोजनावर पाणी फिरवलं. परंतू काहीही झालं तरी लग्न करायचं हा निर्धार मनाशी पक्का केलेल्या रोहित सूर्यवंशीने बोटीतून आपल्या पत्नीसोबत वरात काढली.
सांगली शहरातील गाव भागात राहणाऱ्या रोहित सूर्यवंशी आणि सोनाली बल्लारी यांचा विवाह अनोखा अविस्मरणीय ठरला. २६ तारखेला रोहित आणि सोनाली यांचा विवाहसोहळा ठरवण्यात आला होता. परंतू लग्नाच्या तारखेच्या अगोदरच सांगली शहराला महापुराचा फटका बसला.
सोलापूर : MLA राजेंद्र राऊतांच्या मुलांच्या लग्नात कोरोनाचे नियम धाब्यावर, हजारोंची गर्दी
रोहितच्या घराला तर चारही बाजूने पाण्याचा वेढा होता. त्यामुळे ठरलेल्या दिवशी विवाह सोहळा रद्द करावा लागणार असं चित्र दिसत होतं. परंतू रोहितने ठरलेल्याच दिवशी विवाहसोहळा पार पाडायचा हे ठरवलं होतं. ठरवल्याप्रमाणे रोहित आणि सोनाली यांचा सोहळा पार पडल्यानंतर संकल्प फाऊंडेशनच्या वतीने रोहित आणि सोनाली यांची पुराच्या पाण्यात बोटीतून वरात काढण्या आली. यानंतर नववधूचा घरात गृहप्रवेश झाला.
ADVERTISEMENT