ADVERTISEMENT
वाशी खाडी पुलावर आत्महत्येच्या घटना वारंवार घडत असून, आज एका तरुणानं पुलावरून उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी वेळीच प्रयत्न केल्याने तरुणाला नवं आयुष्य मिळालं.
२३ वर्षीय तरुणाने वाशी खाडीच्या पुलावर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुख्तार खान असं या तरुणाचं नाव आहे.
पुलावरून कुणीतरी खाली उडी मारल्याचं लक्षात आल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले.
स्थानिक पोलीस आणि मच्छिमार महेश सुतार आणि त्यांच्या साथीदाराने लगेचच बोटीच्या साहाय्याने त्याला पाण्याबाहेर काढले.
बाहेर काढल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं कारणही सांगितलं.
“लॉकडाऊनमुळे शिक्षणात खंड पडला आणि आता काहीच आठवत नाहीये, म्हणून आपण हे टोकाचं पाऊल उचललं”, असं या तरुणानं सांगितलं. त्याला आता वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT