राज्यात विधानसभा निवडणुकीआधी महामंडळांच वाटप करण्यात आलं आहे. या वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार नेत्यांच्या वाट्याला महामंडळ आली आहेत. यामध्ये सदा सरवणकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आमदार संजय शिरसाट यांनी महामंडळपदी वर्णी लागली आहे. तर अजित पवार गटाच्या एकाही नेत्याच्या वाट्याला महामंडळ आलेलं नाही. समजून घ्या: नेत्यांची गळती रोखण्यासाठी शिंदेंची काय स्ट्रॅटेजी? युतीत शिंदेंचं स्थान भक्कम होत चाललंय का?