‘NCPला सोनिया गांधींनी मुख्यमंत्री पद दिलेलं, पण साहेबांनी..’, अजित पवारांचा संताप

मुंबई तक

05 Jul 2023 (अपडेटेड: 05 Jul 2023, 12:21 PM)

2004 साली मुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात होतं. मात्र, असं असताना देखील शरद पवारांनी ती संधी नाकारली. नाहीतर आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री पाहायला मिळाला असता. असं अजित पवार म्हणाले.

In 2004, the post of Chief Minister was in the hands of NCP. However, despite this, Sharad Pawar rejected that opportunity. Otherwise we would have seen the Chief Minister of NCP till date in Maharashtra. Ajit Pawar said this.

In 2004, the post of Chief Minister was in the hands of NCP. However, despite this, Sharad Pawar rejected that opportunity. Otherwise we would have seen the Chief Minister of NCP till date in Maharashtra. Ajit Pawar said this.

follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) वांद्रे येथील सभेत जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) संपूर्ण राजकीय इतिहासच काढला. पण यावेळी केवळ शरद पवारांनी मुख्यमंत्री पद सोडलं नाहीतर 2023 पर्यंत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री दिसला असता असं अजित पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून अजित पवारांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे. (2004 post of chief minister ncp despite this sharad pawar rejected opportunity cm of ncp till date in maharashtra ajit pawar sonia gandhi vilasrao deshmukh)

हे वाचलं का?

‘2004 साली आपले 71 आमदार निवडून आले. काँग्रेसचे 69 आमदार निवडून आले. मी आज तुम्हाला सांगतो.. ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री आपल्याला दिसला असता.’ असं म्हणत अजित पवारांनी काहीसा संतापही यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री पदाची संधी सोडली अन् अजित पवार संतापले

‘इतिहास बघितला तर तुमच्या आमच्या देशाला करिष्मा असणारं नेतृत्व लागतं. लोकशाही आहे यात घडलं आहे. एकदा फक्त लोकांनी जेपी नारायण यांचं ऐकून जनता पक्षाला निवडून दिलं होतं. मला सांगा जनता पक्ष आता कुठे आहे? करिष्मा असलेला नेता त्यांचाकडे नव्हता.’

‘प्रत्येकाचा काळ असतो.. आपण साधारण वयाच्या 25 पासून 75 पर्यंत उत्तम काम करू शकतो. एक उत्साह असतो. परंतु हे सगळं घडत असताना काय झालं मला माहीत नाही. पण आम्हाला सांगण्यात आलं की, 1986 साली समाजवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये सामील झाली.’

हे ही वाचा >> BJPच्या मदतीने मंत्री होताच छगन भुजबळांनी शरद पवारांना सुनावलं.. सगळा इतिहासच काढला!

‘नंतरच्या काळात आपल्याला जागा फक्त 58 मिळाल्या. काँग्रेसला राज्यात नेतृत्व नसताना फक्त 75 जागा मिळाल्या. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, भुजबळ उपमुख्यमंत्री झाले. जीवाचं रान केलं. मला तर पहिल्या टर्मला.. बाकीच्यांना महत्त्वाची खाती मिळाली. मला कृष्णा खोऱ्याचं फक्त सात जिल्ह्याचं खातं मिळालं. मी खातं पेललं. प्रशासनावर माझी पकड आहे की, नाही हे उभा महाराष्ट्र जाणतो. मी कधी जाती-पातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही.’

‘2004 साली आपले 71 आमदार निवडून आले. काँग्रेसचे 69 आमदार निवडून आले. मला पक्षात एवढं महत्त्वाचं स्थान नव्हतं. कारण मी, पक्षात छोटा कार्यकर्ता होतो. पण इतर प्रमुख नेते. त्यावेळी सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं की, सगळ्यात जास्त जागा त्यांच्या आल्या आहेत. आता आपल्याला त्यांना मुख्यमंत्री पद द्यावं लागेल. विलासराव हयात नाही. मी अतिशय स्पष्ट बोलणारा आहे. त्यामध्ये आम्हाला विलासरावांनी सांगितलं की, तुमच्यात कोण होईल? त्यावेळेस भुजबळ साहेब, आर. आर. पाटील. माझी काही त्यावेळेस इच्छा नव्हती कारण हे त्यावेळेस वरिष्ठ नेते होते. खरं आहे ते मान्य केलं पाहिजे. सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे असा हव्यास कुणीही मनात ठेवता कामा नये.’

‘पण चार खाती आणि चार मंत्रिपदं जास्त घेऊन आलेली संधी.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं की, संधी आली होती.. मी आज तुम्हाला सांगतो.. ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री आपल्याला दिसला असता.’

‘आम्ही कुठे कामात कमी आहोत का? लोकांमध्ये मिसळायला कमी आहोत का? आम्हालाही कळतं की, निवडून आल्यानंतर मतदारसंघात जनतेची हीच अपेक्षा असते कामं करावी. तशाच पद्धतीने मी काम करत आलो आहे.’

‘2009 ला आपण 62 वर खाली आलो.. स्वत: अशोक चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या 81 जागा निवडून आले. खासदार पण 4, 8, 7 निवडून आले आहेत आतापर्यंत. मला वाटतं आमदार-खासदार अधिक निवडून आले पाहिजे.’

हे ही वाचा >> NCP: भुजबळ म्हणाले बडव्यांनी घेरलं, अमोल कोल्हेंचा पलटवार

‘2014 फक्त 41 आमदारच निवडून आले. तर 2019 ला 54 आमदारच निवडून आले. तरी देखील काही गोष्टी करून सरकार शिवसेना, राष्ट्रवादीचं आणण्याचा प्रयत्न झाला. 2014 ला भाजपची सत्ता आली. भाजपची सत्ता आल्यानंतर आपल्याला विरोधी पक्षात काम करावं लागलं.’

‘आता जो निर्णय घेतला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुमत प्रचंड आहे. हे सगळं करत असताना मंत्रिमंडळात 9 जणांना संधी मिळाली आहे. पुढेही त्याठिकाणी संधी मिळणार आहे. वेगवेगळी खाती, पालकमंत्री पदं मिळणार आहे.’ असं म्हणत अजित पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याला शरद पवारांनाच जबाबदार धरलं आहे.

 

    follow whatsapp