मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)आता मोठी फूट पडली असून त्यानंतर वेगवेगळे दावे, खुलासे आणि गौप्यस्फोट केले जात आहेत. अजित पवार ( यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत पक्षात बंडाचं निशाण फडकावलं. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (2022 eknath shinde 40 mlas surat guwahati mva govt collapse 51 mla ncp clearly felt we should be part of the bjp govt praful patel)
ADVERTISEMENT
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रफुल पटेल यांनी एक मोठा दावा केला. ‘जेव्हा एकनाथ शिंदे हे 2022 साली आमदारांना घेऊन गुवाहटीला गेले होते. तेव्हाच राष्ट्रवादीच्या 51 आमदारांनी सांगितलं की, आपण सत्तेत जायला हवं.’ असा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केला आहे.
पाहा प्रफुल पटेल यांनी नेमकं काय म्हणाले:
‘NCP चे 51 आमदार भाजपसोबत जाण्यास होते तयार’
‘2022 मध्ये, एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन सुरत आणि गुवाहाटी येथे गेले होते, तेव्हा MVA सरकार कोसळेल याची खात्री होती, परिणामी, राष्ट्रवादीचे 51 आमदार होते, ज्यांना त्यावेळी स्पष्टपणे वाटले की आपण सरकारचा भाग व्हावे… यामध्ये तेव्हा कोणताही वैचारिक मतभेद नव्हता. जर आम्ही शिवसेनेसोबत गेलो तर नक्कीच भाजपसोबत जाऊ शकतो.’
दरम्यान, प्रफुल पटेल पुढे असंही म्हणाले की, ‘कौटुंबिक नातेसंबंधात राजकारण येऊ नये, अशी माझी इच्छा आहे. पवार कुटुंबाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि मी स्वतःला पवार कुटुंबाचा विस्तारित घटक मानतो. सध्या जो निर्णय घेतला तो त्यांनी मान्य करावा, असे आपण फक्त शरद पवारांना आवाहन करू शकतो. त्यांना जे चांगले वाटते त्यानुसार ते स्वत:चा निर्णय घेऊ शकतात.’ असंही ते यावेळी म्हणाले.
‘आमच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार’
याचवेळी प्रफुल पटेल यांनी अत्यंत मोठा असा दावा केला आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. असं प्रफुल पटेल म्हणाले आहेत.
मात्र असं असलं तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते आमदार कोणाच्या पाठिशी आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, हे उद्याच (5 जुलै) स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण की, अजित पवार गटाने उद्या अकर वाजता मुंबईत भुजबळ नॉलेज सिटीमध्ये आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाने देखील उद्याच दुपारी एक वाजता आमदार-खासदार, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे.
त्यामुळे आता या दोन बैठकीला नेमके किती आमदार येणार यावरुन नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर नेमका राजकीय पक्ष कोण याबाबत देखील स्पष्टता येऊ शकते.
ADVERTISEMENT