Sanjay Raut: मुंबई: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही आपल्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. याच निमित्ताने आज (11 ऑगस्ट) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आणि आरतीही केली. ज्याचा व्हिडीओ आणि फोटो आता समोर आले आहेत. ज्यानंतर शिवसेना (UBT) चे नेते संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका केली आहे. (after it came to light that pm modi went to the house of chief justice chandrachud shiv sena ubt leader sanjay raut criticized)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सरधान्याधीश चंद्रचूड यांच्या घरी गेल्याने आता या भेटीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
हे ही वाचा>> CJI DY Chandrachud: सरन्यायाधीशांच्या घरी PM मोदी, गणपती बाप्पांची केली खास आरती!
संजय राऊत यांनी X वर 'क्रोनोलॉजी समज लिजीये' असं ट्वीट करत PM मोदी आणि CJI चंद्रचूड यांच्या भेटीवर निशाणा साधलाय.
सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेले निकाल किंवा महत्त्वाच्या याचिकांवर सातत्याने दिल्या जाणाऱ्या तारखा यावर थेट टिप्पणी केली आहे.
सर्वात आधी आपण संजय राऊत यांचं नेमकं ट्वीट काय आहे ते पाहूयात...
असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
सरयान्याधीश यांच्या घरी पंतप्रधानांनी जाणं हे न्यापालिकेचं स्वातंत्र्य आणि विश्वाहर्ता यावर प्रश्न उपस्थित होतील. अशी टीकाही आता सोशल मीडियावरून केली जात आहे.
हे ही वाचा>> Exculsive: 'फडणवीस, बावनकुळेंसाठी 'हा' इशारा पुरेसा', किरीट सोमय्या एवढं थेट बोलले अन्...
दरम्यान, या सगळ्या मुद्द्यावर भाजप विरोधकांना नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरन्यायाधीशांच्या घरी जाताना पंतप्रधान मोदींची खास वेशभूषा
धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष असा मराठमोळा वेष परिधान केला होता. त्यांनी कुडता, धोतर, उपरणं आणि गांधी टोपी या गोष्टी परिधान केलेला.
ADVERTISEMENT