Devendra Fadnavis: शपथविधीनंतर CM फडणवीसांनी 'या' फाइलवर केली सगळ्यात आधी सही

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संबंधित एका फाईलवर सही केली.

फडणवीसांनी 'या' फाइलवर केली सगळ्यात आधी सही

फडणवीसांनी 'या' फाइलवर केली सगळ्यात आधी सही

मुंबई तक

• 09:12 PM • 05 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या फाइलवर केली सगळ्याती आधी सही?

point

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोणत्या फाइलवर केली सही?

CM Devendra Fadnavis: मुंबई: मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. (after the oath taking ceremony cm devendra fadnavis was the first to sign the file of the chief minister relief fund)

हे वाचलं का?

पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.

हे ही वाचा>> Eknath Shinde: आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ शिंदेंनी राज्यपालांना दिलं 'ते' पत्र!

चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

'अधिक गतीने काम करा', CM फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश

दरम्या,न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आणि अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. 'जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल.' असे ते यावेळी अधिकाऱ्यांना म्हणाले.

हे ही वाचा>> Raj Thackeray : "सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर...", शपथविधी होताच राज ठाकरेंची पोस्ट

'आता गती वाढवू आणि अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन  शाश्वत विकास कसा साध्य करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूयात.' असेही ते म्हणाले

मुख्य सचिव सुजाता सौनिकांकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

    follow whatsapp