Maratha Reservation : अजित पवार जरांगेंवर संतापले, 'आपण काय बोलतोय, कशासाठी...',

Ajit Pawar Reaction On Manoj Jarange Allegation : काहीजण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एसपी यांच्याशी बोलताना शिवराळ भाषा वापरत आहे. हे नक्की कोण करतंय, एवढं धाडस कसं होत आहे, याची खोलवर चौकशी करण्याची गरज आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत.

जरांगेंच्या या इशाऱ्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सागर बंगला हा सरकारी आहे, कुणीही सरकारी कामानिमित्त कधीही येऊ शकतं', असे उत्तर त्यांनी जरांगेना दिले आहे.

devendra fadnavis reaction on manoj jarange patil maratha reservation sangar bunglow antarwali sarati cm eknath shinde

मुंबई तक

25 Feb 2024 (अपडेटेड: 25 Feb 2024, 09:38 PM)

follow google news

Ajit Pawar Reaction On Manoj Jarange Allegation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज देवेद्र फडणवीस माझा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच मला सलाईनमधून विष देऊन मारून डाकण्याचा डाव आहे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप देवेंद्र फडणवीसांवर केले होते. जरांगेंच्या या आरोपावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  (ajit pawar angry on manoj jarange patil devendra fadnavis allegation sagar bunglow maratha reservation) 

हे वाचलं का?

प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा सविधानाने अधिकार दिलेला आहे. परंतू आपण काय बोलतोय? कशा पद्धतीने बोलतोय, हे थोडे पाहिले पाहिजे. काहीजण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एसपी यांच्याशी बोलताना शिवराळ भाषा वापरत आहे. हे नक्की कोण करतंय,  एवढं धाडस कसं होत आहे, याची खोलवर चौकशी करण्याची गरज आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Manoj Jarange : 'सलाईनमधून विष देण्याचा डाव'

मराठा आरक्षणावर फार बारकाईने काम केले जात आहे, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाते. परंतु मुख्यमंत्र्यांबाबत शिवराळ भाषा केली जाते.अशी पद्धत महाराष्ट्रात कधीही नव्हती. काहीही बोललं तरी खपतं असं कोणी समजू नये. असे होणार नाही. शेवटी सर्वांना नियम आणि कायदे सारखे आहेत, असा इशाराही अजित पवारांनी जरांगे पाटलांना दिला. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

'सागर सरकारी बंगला आहे, कुणीही सरकारी कामानिमित्त कधीही येऊ शकतं', असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच 'ते कुठल्या निराशेतून बोलतायत याबाबत मला कल्पना नाही. पण त्यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि धादांत खोटं असल्याचे' देवेंद्र फडणवीसांनी म्हणत फेटाळून लावले आहेत. 

हे ही वाचा : Manoj jarange : 'सांगर बंगल्याची भिंत ओलांडून...'

मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही टीकवलं. माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते, त्यांना आरक्षण टीकवता आले नाही, अशी टीका फडणवीसांनी नाव न घेता ठाकरेंवर केली. तसेच जी स्क्रिप्ट उध्दव ठाकरे बोलतात, शरद पवार बोलतात, नेमका तोच विषय जरांगेंनी का मांडावा असा मला प्रश्न पडलाय,असे देखील फडणवीस म्हणाले आहेत. 

    follow whatsapp