Ajit Pawar : ''माझा दौरा रद्द करणारा अजून...'', पक्षातील नेत्यालाच अजित पवारांनी झापलं

मुंबई तक

22 Sep 2024 (अपडेटेड: 22 Sep 2024, 08:19 PM)

Ajit Pawar On Umesh Patil : अजित पवारांनी पुढे एक उदाहरण देताना सांगितले, बैलगाडी खाली एक कुत्र चाललेलं असतंय, त्याला वाटतं मी गाडी आढतोय. पण, अरे तुझ्या पुढं बैलं आहेत, ती ही गाडी आढतायंत, तू देवळातली घंटा हलवतो का?, अशा शब्दात अजित पवारांनी उमेश पाटलांवर टीका देखील केली.

ajit pawar criricize umesh patil in mohol band incident sunil tatkare rajan patil vs umesh patil maharashtra politics

आजच्या सभेत अजित पवारांनी उमेश पाटलांना झापलं आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

तू देवळातली घंटा हलवतो का?

point

अजित पवाराचा दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचाय

point

आजच्या सभेत अजित पवारांनी उमेश पाटलांना झापलं आहे.

Ajit Pawar On Umesh Patil : ''मध्ये कोणीतरी पट्ट्या म्हणाला, दादांचा दौरा मी रद्द केला, अरे तू कसा रद्द केला.अजित पवाराचा दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचाय'', अशा शब्दात अजित पवारांनी पक्षातील नेते उमेश पाटील यांचे नाव न घेता त्यांना चांगलच सुनावलं आहे. पक्षातील माजी आमदार राजन पाटील यांच्याशी असलेल्या वादामुळे उमेश पाटील (Umesh Patil) यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर आजच्या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) उमेश पाटलांना झापलं आहे. (ajit pawar criricize umesh patil in mohol band incident sunil tatkare rajan patil vs umesh patil maharashtra politics) 

हे वाचलं का?

मोहोळ येथे अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वीच अजित पवार गटातील नेते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली होती. यावर अजित पवारांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. ''मध्ये कोणतरी पट्ट्या म्हटला, दादांचा दौरा मी रद्द केला. अजित पवारने आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचाय, असे म्हणत अजित पवारांनी उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधानांचा कार्यक्रम असल्याने शेवटी आपल्याला अॅडजस्ट करावी लागते. त्यामुळे मी माझा दौरा पुढे ढकलल्याची माहिती दिली. पण कुणी मध्येच म्हणतेय माझ्यामुळे झाला, असे अजित पवारांनी सांगितले.

हे ही वाचा : Video : अरबाज किंवा निक्की आज घराबाहेर जाणार...,भाऊच्या धक्क्यावर कुणाचा होणार गेम?

अजित पवारांनी पुढे एक उदाहरण देताना सांगितले, बैलगाडी खाली एक कुत्र चाललेलं असतंय, त्याला वाटतं मी गाडी आढतोय. पण, अरे तुझ्या पुढं बैलं आहेत, ती ही गाडी आढतायंत, तू देवळातली घंटा हलवतो का?, अशा शब्दात अजित पवारांनी उमेश पाटलांवर टीका देखील केली.

 उमेश पाटील काय म्हणाले? 

''अजित पवारांचा दौरा मी रद्द करायला लावला, असं मी कधीही म्हणालो नाही. अनगरच्या राजन पाटलांनी त्यांना चुकीची माहिती दिली. दादांचा दौरा रद्द करण्याएवढा मी मोठा नाही, जर दादा माझं ऐकत असते तर मोहोळच्या आमदाराचे तिकीट रद्द केलं असतं'' असं उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा : Prataprao Jadhav : ''आम्ही तीन पिढ्या वीज भरलं नाही'', शिंदेंचा मंत्री 'हे' काय बोलून गेला?

सुनील तटकरे यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार, असा इशारा दिलाय. त्यावरही उमेश पाटील म्हणाले, 'प्रदेशाध्यक्ष तशी कारवाई करणार असाल तर आधी आमदार यशवंत माने यांच्यावर कारवाई करावी लागेल. कारण आमदार यशवंत माने हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना गाडीत घेऊन फिरतात. सरकारकडून आलेल्या निधीच्या विकासकामांचे उद्घाटन शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना घेऊन करतात. त्यामुळे आमदार यशवंत माने यांची पक्षातून पहिल्यांदा हकालपट्टी केली पाहिजे' असं उमेश पाटील म्हणाले.

    follow whatsapp