Ajit Pawar on Devendra Fadnavis Letter About Nawab Malik : नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास आमचा विरोध आहे, असे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिले. या पत्रावर अजित पवार काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर पवारांनी त्या पत्रावर मौन सोडले आणि मलिकांबद्दल कधी भूमिका मांडणार हेही स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यानंतर अजित पवार यांनी प्रकरणावर भाष्य केले.
हेही वाचा >> नवाब मलिकांची महायुतीत एन्ट्री! भाजपची पंचाईत; नागपुरात काय घडलं?
नवाब मलिकांसंदर्भात फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, “मला पत्र मिळाले. ते पत्र मी वाचले. नवाब मलिक पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते कुठे बसले, हे टीव्हीवाल्यांना दाखवलं. यामध्ये नवाब मलिकांची भूमिका… कारण आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आम्ही २ जुलैला महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यापद्धतीने आम्ही सरकारमध्ये गेलोय.”
मलिकांना भूमिका मांडू द्या -अजित पवार
“यानंतर पहिल्यांदाच ते सभागृहात आले. त्यामुळे त्यांची भूमिका काय, कुणाची नवाब मलिकांची… कारण प्रत्येकाला आपापली भूमिका विशद करण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतर मी त्याबद्दल मत देईन”, असे अजित पवार नवाब मलिक यांच्याबद्दल बोलताना म्हणाले.
हेही वाचा >> ‘अरे बापरे’… राऊतांनी फडणवीसांना पकडलं कात्रीत, काढली जुनी प्रकरणं
“तब्येतीच्या कारणामुळे न्यायालयाने त्यांना संधी दिली आहे. अजून त्यासंदर्भातील प्रकरणे सुरू आहेत. त्यांचं मत काय आहे, ते तरी स्पष्टपणे कळू द्या. कुणी कुठे बसावं हा माझा अधिकार नाही. तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. त्या पत्राबद्दल काय करायचं, ते माझं मी करेन. ते काही माध्यमांना सांगण्याचं कारण नाही”, असे उत्तर अजित पवार यांनी फडणवीस यांच्या पत्राबद्दल बोलताना दिली.
ADVERTISEMENT