Ajit Pawar Baramati Speech : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली आहे. कणखर वकृत्व आणि थेट बोलण्याच्या भूमिकेमुळं अजित पवार नेहमीच चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बारामती मतदारसंघ राजकारणाचं केंद्रबिंदू झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे बारामतीच्या सभा कार्यक्रमात केलेलं वक्तव्य लगेच प्रकाशझोतात येतं. बारामतीच्या मेडदमध्ये खरेदी विक्री संघाच्या नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आलं. परंतु, भाषणादरम्यान कार्यकर्त्यांचे निवेदन पाहताना पवार मतदारांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. 'तुम्ही मला मत दिलं म्हणजे माझे मालक झाला नाही', अशा शब्दात पवारांनी कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली.
ADVERTISEMENT
जनतेला संबोधीत करताना अजित पवार म्हणाले, गजाजन पाटील इथले मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. त्यांना बारामतीची सर्व माहिती आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करणार आहे की, बारामतीच्या हिश्शाचा जो जिल्हा परिषदेचा निधी असेल, तो निधी तेराही तालुक्यांना द्यावा लागेल. त्याच्यातला काही हिस्सा बारामतीलाही मिळेल. दहा दहा लाख..पाच पाच लाख याने काहीही होत नाही. काही जण कामं घेतात आणि कामं दुसऱ्याला विकतात. मी ते चालू देणार नाही. तुम्हाला काम करायची असतील, तर साईटवर उभे राहा. कॅप घालून उभं राहा. काम मला करून दाखवा.
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: "मला मंत्री व्हायचंय म्हणून...", धनंजय मुंडेंच्या राजीनामाच्या मागणीवर भुजबळ काय म्हणाले?
मी माझ्या मानसिकतेत बदल केला आहे. तुम्ही मला आठव्यांदा निवडून दिलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो. पण मी काही मी काही गोष्टीत बदल केला आहे, तो मी माझ्या स्वत:साठी नाही. बारामतीकरांच्या भल्यासाठी केला आहे. वेगवेगळ्या गावातील चांगली दर्जेदार विकासकामे होण्यासाठी बदल केला आहे. राज्यस्तरीय शिवशाही कब्बडी स्पर्धा सुरु करण्यासाठी रेल्वेच्या मैदानावर चार मैदाने करत आहोत.स्टेडियमसारख्या गॅलरी तिथे करणार आहोत.खेळाडूंना सरकार 75 लाख रुपये अनुदान देतं. आपण दोन कोटी रुपयांच्या उत्तम स्पर्षा बारामतीच्या, राज्याच्या आणि शिवशाहीच्या नावाला साजेशा राहतील, अशाप्रकारे करतोय.
हे ही वाचा >> Chandrashekar Bawankule: "मोदींवर बोलण्याची लायकी...", चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
ADVERTISEMENT
