मुंबई: राज्याच्या राजकारण हे मागील काही महिन्यांपासून प्रचंड अस्थिर झालं आहे. एकीकडे शिंदे सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा प्रचंड जोर धरत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र, प्रचंड मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे.’ असं म्हणत शरद पवारांनी राज्याचा राजकारणात काही तरी मोठी घडामोड होण्याचे संकेतच जणू काही दिले आहेत. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या तरी सारं काही आलबेल नसल्याचीही चर्चा जोर धरत आहे. शरद पवार हे मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (an indicative statement of sharad pawar will stir up the politics push ajit pawar to the back foot)
ADVERTISEMENT
‘मघाशी कोणीतरी सांगितलं की, भाकरी फिरवावी लागते.. आणि ती फिरवली नाही तर ती करपते. आणि म्हणून भाकरी फिरवायची वेळ आता आलेली आहे. आता नक्की ही वेळ आलेली आहे. की विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह मी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडे करेन. एवढंच या ठिकाणी सांगतो.’ असं म्हणत करत शरद पवार यांनी आगामी राजकारणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
अजित पवारांना पुन्हा शह देणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळालं आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असल्याने पक्षाबाबत नेमके निर्णय आणि धोरणं हे तेच ठरवतात. मात्र, असं असतानाही अनेकदा अजित पवार हे पक्षाच्या भूमिकेच्या विपरित वागत असल्याचं पाहायला मिळालं आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पहाटेचा शपथविधी.
महाविकास आघाडी सरकार गेल्यापासून अजित पवार हे अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच ते 40 आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, याबाबत जेव्हा शरद पवारांनी नेमकी भूमिका स्पष्ट केली त्यानंतर अजित पवारांना माध्यमांसमोर येऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
हे ही वाचा>> CM एकनाथ शिंदे सुट्टीवर! मुंबई अन् ठाणे सोडून थेट सातारा गाठलं; कारण रात्री 2 वाजता…
असं असताना आता शरद पवार यांनी थेट भाकरी फिरवावी लागते असं विधान करुन एक प्रकारे पक्षातील अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्याचे संकेत तर दिले नाही ना? अशा चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे शरद पवार हे पुन्हा एकदा अजित पवारांना शह देण्याचा तयारीत असल्याचंही बोललं जात आहे.
पाहा शरद पवार आपल्या भाषणात नेमकं काय-काय म्हणाले:
-
- मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसर्फे आयोजित युवा मंथन कार्यक्रमात पक्षाच्या मुंबईतील युवा संघटनेशी संवाद साधला. राज्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी कष्ट करणारे, वेळ देणारे, लोकांमध्ये समरस होणारे हजारो कार्यकर्ते आहेत. पण त्यामध्ये काही बदल करण्याचे मत काही वक्त्यांनी व्यक्त केले. १९६० साली मी युवक काँग्रेसचा पदाधिकारी झालो, १९६४ साली युवक काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख झालो आणि नंतर १९६६ साली राज्यातील युवकांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.
- आयुष्याच्या उमेदीच्या काळात अनेक गोष्टींची आपल्याला माहिती व संधी नसते. पण निर्धार पक्का असला तर आपण अडचणींवर निश्चित मात करू शकतो. त्यामुळे पक्षाला नेतृत्व तयार करण्यासाठी तरूणांपासून सुरुवात करावी लागेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरूणांनी विचारधारा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला तर जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत.
- मी २६ वर्षांचा असताना १९६७ साली आम्ही गोंधळ करून काही जागा तरूणांसाठी असाव्यात अशी आग्रही मागणी केली. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी ही भूमिका स्वीकारून काही तरूणांना संधी दिली, ज्यामध्ये माझेही नाव होते. वयाच्या २७ व्या वर्षी मी विधानसभेत निवडून आलो. तेव्हापासून आजपर्यंत अनेक संधी मिळाल्या. त्याची सुरुवात युवक चळवळीतून झाली होती. तुमचे भविष्य घडवण्याची कुवत ही तुमच्यामध्येच आहे. तुम्ही कष्ट करण्याची तयारी दाखवली की यशस्वी चित्र बघायला मिळेल यात शंका नाही.
ADVERTISEMENT