BJP Observers : भारतीय जनता पक्षाने राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमधील (Chhattisgarh) भाजप निरीक्षकांची नावं जाहीर केली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh), विनोद तावडे आणि सरोज पांडे यांची राजस्थानचे निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, के लक्ष्मण, आशा लाक्रा यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांची छत्तीसगडसाठी निवड झाली आहे.
ADVERTISEMENT
हिंदी पट्ट्यात पकड मजबूत
निवड केलेले हे निरीक्षक विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांचे मत घेणार आहेत. भाजप हायकमांडच्या निर्णयानंतर रविवारपर्यंत नावांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने हिंदी पट्ट्यात आपली पकड मजबूत केली असून भाजपसाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा >> Crime: मुंबईतील महिला डॉक्टरचा न्यूड व्हिडीओ केला शूट, ‘हा’ व्यक्ती करायचा नको ते!
आगामी निवडणुकीची समीकरणं
भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतानाही त्यांनी निवडणूक लढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची इमेज आणि सामूहिक नेतृत्वाच्या बळावर पक्षाकडून तिन्ही राज्यात राज्यात विजय मिळवता आला आहे. मात्र आता या तिन्ही राज्यात नेमकं कोणाला मुख्यमंत्री बनवायचं हे मोठं आव्हान आहे. सध्याच्या निवडणुकीतील चेहऱ्यांवरच 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सर्व समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर दुसरीकडे बंडखोरीचा प्रयत्न झाला तर बंडखोरीही त्यांना रोखायची आहे.
‘ती’ तीन नावं चर्चेत
आता मुख्यमंत्री म्हणून नावं कोणाची जाहीर करायची यावर भाजपची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता भाजपच्या 11 खासदारांनी राजीनामाही दिला आहे. या सर्व सदस्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत विजय संपादन केला आहे. त्यामुळे या खासदारांमधील तिघं जण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्येही असल्याचे सांगण्यत येत आहे.
सीएम पदाचा चेहरा
राजस्थान : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे, खासदार दिया कुमारी, ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत आणि बाबा बालकनाथ यांची नावे आहेत.
मध्य प्रदेशः शिवराज सिंह चौहान, प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह आणखी काही नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये रमन सिंह, बीजेपी प्रदेश अध्यक्ष अरुण साव, रेणुका सिंह आणि ओपी चौधरी यांची नावंही सीएम पदाच्या रेसमध्ये आहेत.
ADVERTISEMENT