Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परदेश दौऱ्यावरून टीका केलीय. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी एका छोट्याशा चहाच्या दुकानावरून सुरु केलं. अत्यंत संघर्ष करून मोदीजी देशाच्या या पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या आयुष्याचा जर अभ्यास केला, तर टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे हे मोदींची करू शकत नाही. उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहीजे की, मोदींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे 140 कोटी जनतेसाठी समर्पित केलं आहे. त्यांचं समर्पण, त्याग हा सूर्यप्रकाशाइतका सत्य आहे, उद्धव ठाकरेंनी अतिविलासावर बोलू नये. खरंतर केजरीवालांच्या शिसमहलवर उद्धव ठाकरे हे बोलले आहेत. मोदींवर बोलण्याची लायकी नाहीय,असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कसा अतिविलास केला. दोन दिवस सुद्धा ते विधानभवनात, मंत्रालयात आले नाहीत. स्वत:ला काचेच्या कॅबिनमध्ये बसवून त्या ठिकाणी अतिविलास केला. उद्धव ठाकरेंनी अतिविलासावर बोलू नये. खरंतर केजरीवालांच्या शिसमहलवर उद्धव ठाकरे हे बोलले आहेत. मोदींवर बोलण्याची लायकी नाहीय. केजरीवालांना सपोर्ट करण्यासाठी मोदींवर टीका करणे..त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे.
हे ही वाचा >> 6 January 2025 Gold Rate: नवीन वर्षातच सोन्याचा धमाका! मुंबईत सोन्या-चांदीच्या भावाने ग्राहकांना फोडलाय घाम
चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्वीट जसच्या तसं
"अडीच वर्षे घरात बसून ‘अतिविलास‘ करणारे उद्धव ठाकरे सामनामधून पंतप्रधान आदरणीय श्री @narendramodi जींवर टीका करतात. हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. विलासी असा आरोप करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदीजींचा जीवनप्रवास बघावा. एक चहावाला पंतप्रधान होतो, तेव्हा तो त्यांच्या साधेपणानं आणि मेहनतीनंच.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचं भिवंडी कनेक्शन आहे तरी काय?
मा. मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखालील देशाचा विकास होतोय. मोदीजींनी त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात कायमच साधेपणा जपला आहे. मात्र, त्यांचा साधेपणा ‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही. त्यामुळेच ते दिल्लीत शीशमहल बांधणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या मदतीला धावून आले आहेत.
पंतप्रधानांचे परदेश दौरे देशाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी असतात. भेटवस्तूंचा विषय उगाच गाजवून देशातील विकासावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. भारताचे जागतिक स्थान उंचावले गेले आहे, याचा तुम्हाला खरा त्रास होत आहे".
ADVERTISEMENT
