CBSE Education: राज्यातील सर्व शाळांना CBSE अभ्यासक्रम अनिवार्य?, दादा भुसेंची मोठी घोषणा

CBSE Pattern In Maharashtra Government School : राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये लवकरच सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार आहे. सरकारने राज्य मंडळांच्या शाळांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे.

Dada Bhuse On CBSE Pattern In Maharashtra School

Dada Bhuse On CBSE Pattern In Maharashtra School

ऋत्विक भालेकर

20 Mar 2025 (अपडेटेड: 20 Mar 2025, 06:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

CBSE पॅटर्नबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली महत्त्वाची माहिती

point

भाजप नेते प्रसाद लाड यांच्या प्रश्नांना दादा भुसेंनी दिलं लेखी स्वरुपात उत्तर

point

विद्यार्थ्यांना CBSE अभ्यासक्रम अनिवार्य असणार का?

CBSE Pattern In Maharashtra Government School : राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये लवकरच सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार आहे. सरकारने राज्य मंडळांच्या शाळांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. मात्र, असं असलं तरी हा अभ्यासक्रम स्वीकारणं अनिवार्य आहे की, वैकल्पिक याबाबत अद्याप तरी सरकारच्या वतीने कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिलेली असून त्याच्या अंमलबजावणीबाबत विचार-विनिमय सुरू आहे.

हे वाचलं का?

राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर CBSE अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. या सत्राची सुरुवात 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी प्रसाद लाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. 

हे ही वाचा >> Nagpur Violence : दंगलीची पोस्ट, बांगलादेश ते थेट फेसबूक कंपनीशी संपर्क... नागपूर सायबरसेलनं सगळंच काढलं

भाजप नेते प्रसाद लाड यांनी विचारलेले प्रश्न

1) राज्यातील तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. जानेवारी 2025 मध्ये किंवा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय?

2) असल्यास राज्य मंडळांच्या शाळांसाठी केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसईचा) बहुतांश अभ्यासक्रम स्विकारण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय?

3) असल्यास, सीबीएसई अंतर्गत असलेली पाठ्यपुस्तके इंग्रजी व हिंदी माध्यमात उपलब्ध आहेत. मराठीसह अन्य माध्यमांसाठी ती उपलब्ध करून दिली जाणार असून राज्य मंडळांच्या शाळांचे वार्षिक वेळापत्रक 15 जूनपासून सुरु होत असून नवीन शैक्षणिक सीबीएसईच्या वार्षिक वेळापत्रकानुसार 1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय?

4) या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने सीबीएसई अंतर्गत असलेली पाठ्यपुस्तके मराठीसह, अन्य माध्यमांसाठी ती उपलब्ध करून देण्याबाबत तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सीबीएससीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार 1 एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली?

5) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

हे ही वाचा >> Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन तरुणाला घेरून मारलं, तीच पद्धत आणि तसाच व्हिडीओ व्हायरल, प्रकरण काय?

यावार राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पहिल्या दोन प्रश्नांना उत्तर देत म्हटलं, हे अंशत: खरं आहे. प्रश्न क्रमांक 3,4 आणि 5 बाबत माहिती दिली की, राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिलेली असून त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात विचार विनिमय सुरु आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. 

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला असल्याचं समजते. तसच शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीतही निर्देश देण्यात आले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासाठी आवश्यक ते बदल करावेत, असेही निर्देश सरकारकडून देण्यात आले होते. 

    follow whatsapp