Kalyan Loksbha Election 2024, Eknath Shinde : कल्याण लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मध्यंतरी लोकसभेच्या याच जागेवरून स्थानिक पातळीवर भाजप-शिंदे गटात मोठा वाद पेटला होता. त्यानंतर सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी मध्यस्थी करून हा वाद शमवला होता. या सर्व घडामोडीनंतर आज शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याने श्रीकांत शिंदे यांची मतदार संघातील ताकद वाढणार आहे. त्याचसोबत लोकसभेची उमेदवारीही देखील पक्की होणार आहे. (cm eknath shinde visit thane today kalyan loksabha election 2024 shrikant shind bjp vs shivsena shinde group maharashtra politics)
ADVERTISEMENT
आगामी लोकसभा निवडणूकीत भाजप जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागले आहे. तर महाराष्ट्रात भाजपला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीची साथ लाभली आहे. भाजपसोबत हे दोन्ही गट आल्याने लोकसभेच्या जागांचा तिढा वाढला आहे. यामुळे लोकसभेच्या काही जागावरून भाजप-शिवसेनेमध्ये वाद सुरु आहे. कल्याण लोकसभेच्या मतदार संघाबाबत तेच घडले आहे.
हे ही वाचा :Shiv Sena : ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-पवारांवर टीकास्त्र, ‘खाल्ल्या ताटात घाण…’
कल्याण मतदार संघातून श्रीकांत शिंदे यांनी दोनदा लोकसभा निवडणूक लढवून जिंकली होती. यंदाच्या वर्षी श्रीकांत शिंदे यांनी हॅट्ट्रीक साधण्याची संधी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रीकांत शिंदे सुपुत्र असल्याने त्यांना ही जागा निश्चित मानली जात होती. मात्र तरीही कल्याणच्या या जागेवरून भाजप शिंदेमध्ये वाद सुरु होता. या वादात श्रीकांत शिंदे कल्याणची जागा लढतील असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी देऊन देखील, कल्याणची जागा आम्हीच लढू आणि जिंकू देखील असा दावा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली होता. तर शिवसेना भाजप युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्याने आमच्याकडेच असे शिंदे गटाने दावा केला होता. त्यामुळे कल्याणच्या या जागेवरून भाजप शिवसेना आमने सामने आले होते.
या सर्व घडामोडीनंतर कल्याण लोकसभा मतदार संघाची जागा भाजपकडून श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोडली जाऊ शकते, असे राज्याचे सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जाहीर करून वादावर पडदा टाकला होता.
हे ही वाचा :Mumbai Crime : ‘तुला भेटून चूक झाली’ म्हणत तरूणाने संपवलं आयुष्य, पण…
दरम्यान हा वाद शमल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याण लोकसभा मतदार संघ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे कळवा ते अंबरनाथ शहरातील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. यानिमित्त ते अनेक मान्यवरांची भेट घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीच्या उंबरठ्यावर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याने कल्याण लोकसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे यांची ताकद वाढणार आहे.तसेच हा दौरा श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधील उमेदवारी देखील निश्चित करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
ADVERTISEMENT