India Today Conclave: ' NCP ला सोबत घेणं आमच्या मतदारांना अजिबात आवडलं नाही', फडणवीस हे काय बोलून गेले

मुंबई तक

26 Sep 2024 (अपडेटेड: 26 Sep 2024, 05:13 PM)

Devendra Fadnavis Speech In India Today :इंडिया टुडेच्या कॉन्क्लेवमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत (अजित पवार) मोठं विधान केलं.

Devendra Fadnavis Speech At India Today Conclave

Devendra Fadnavis Speech At India Today Conclave

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील होण्याबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

point

देवेंद्र फडणवीसांनी NCP महायुतीत येण्याबाबत मोठं विधान केलं

point

इंडिया टुडेच्या कॉन्क्लेवमध्ये अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis Speech In India Today :इंडिया टुडेच्या कॉन्क्लेवमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत (अजित पवार) मोठं विधान केलं. विरोधी पक्षनेता म्हणून (देवेंद्र फडणवीस) अजित पवार यांच्या पक्षाला तुम्ही सर्वात जास्त हल्लाबोल करत होते. कोट्यावधींच्या सिंचन घोटाळ्याला यात सहभागी केलं. भाजपच्या पक्क्या समर्थकांना हे पटलं नाही, म्हणून लोकसभेत ही परिस्थिती निर्माण झाली,यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार) यांना सोबत घेतलं, ते आमच्या मतदारांना आवडलं नाही, मी याच्याशी सहमत आहे." (In the India Today Conclave, State Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized the Nationalist Congress Party (Ajit Pawar)

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,आम्ही त्यांच्यासमोर काही गोष्टी समोर आणल्या. ते कोणत्या परिस्थितीत आले, आम्ही कोणत्या परिस्थितीत त्यांना सोबत घेतलं. आमच्या मतदारांच्या लक्षात आलंय की, राजकारण अनेकदा अशी परिस्थिती येते, ज्यावेळी तुम्हाला तडजोड कराव्या लागतात. काही तडजोड अशा असतात, ज्या लोकांना मनापासून आवडत नाहीत. पण त्या तुम्हाला कराव्या लागतात. त्याप्रकारच्या तडजोड आम्ही केल्या आहेत. आम्ही असा निर्णय का घेतला, याबाबत आम्ही 80 टक्के लोकांना पटवून सांगितलं आहे. 

हे ही वाचा >> Sanjay Raut: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार? नेमकं प्रकरण काय?

जागावाटपाबाबत देवेंद फडणवीस काय म्हणाले? 

जागावाटपात कमी जागा मिळाल्या तर आमच्याबद्दल काय विचार केला जाईल? असा मायना असतो. परंतु अशावेळी प्रॅक्टिकल विचार करावा लागेल, केवळ नंबर्सवर जाण्याची आवश्यकता नाही. विनेबिलीट महत्त्वाची गोष्ट असते. ज्यावेळी तीन पक्ष युतीत एकत्र येतात, त्यावेळी विनेबिलिटी आणि परसेप्शन्सबद्दल विचार केला जातो. अशावेळी परसेप्शन्सवर कमी आणि विनेबिलिटीवर जास्त काम करावं लागतं. आम्ही तिन्ही पक्षांच्या अपेक्षांचा विचार करून जवळपास ८० टक्के जागावाटप केलेलं आहे. कोण कोणती जागा लढणार? हे ठरलेलं आहे. उरलेल्या २० टक्के जागांबद्दल आमचं अजूनही बोलणं सुरू आहे.

हे ही वाचा >> बायकोला बिकिनी घालून बीचवर फिरायचं होतं, नवऱ्यानं आख्खा ISLAND विकत घेतला, Video व्हायरल

शिंदेंच्या स्ट्राईक रेटबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्या जागा कमी झालेल्या असल्या तरी आम्हालाच सर्वाधिक मतं मिळालेली आहे. स्ट्राईक रेटला काहीही अर्थ नसतो. कुणी १ चेंडूत ४ धावा करून बाद झाला तर त्याचाही स्ट्राईक रेट वाढू शकतो. महाराष्ट्रात नंबर पार्टी केवळ भाजप आहे. शिवसेनेच्या वोटरचा आमच्याकडे ट्रान्सफर झाला, अजितदादांचा मतदार आमच्याकडे आला नाही. लोकसभा निवडणूक दोन्ही नवीन पक्षांच्या मतदारांना सेटल करण्यासाठी होती.

    follow whatsapp