Ajit Pawar India Today Conclave: मुंबई: इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. पण याचवेळी त्यांना एक असा प्रश्न विचारण्यात आला की, ज्यावर सर्वांचीच उत्सुकता बरीच ताणली गेली. (did sunetra pawar stand against supriya sule on amit shah orders know ajit pawar answer)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करण्याचा निर्णय नेमका कोणाचा होता? याबाबत अजित पवार यांनी थेट उत्तर दिलं आहे. पाहा अजित पवार याबाबत नेमकं काय म्हणाले.
अजित पवारांचं 'त्या' प्रश्नावर थेट उत्तर
प्रश्न: सुप्रिया सुळेंविरोधात तुम्हाला सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करावं लागेल हे तुम्हाला अमित शाह यांनी सांगितलं होतं का?
अजित पवार: मला अजिबात कोणीही सांगितलं नव्हतं. पहिलेच मी तुम्हाला सांगितलं आहे. मी कोणाचं ऐकत नाही.. माझ्या मनात जे येईल ते मी करतो. अमित शाह किंवा कोणीही मला सांगितलं नव्हतं. जेव्हा लोकसभेचा निकाल आणि काही दिवस उलटले तेव्हा माझ्या मनात आलं की, मी जो निर्णय घेतला होता तो चुकीचा होता.
त्यानंतर मी एका मुलाखतीत मी ती चूक झाल्याचं सांगितलं. मी सांगितलं ना.. मी तसं नव्हतं करायला हवं हे सांगितलं. जो काम करतो ना त्याचीच चूक होते. जो काम करत नाही त्याची चूक होत नाही.
प्रश्न: तुम्ही शरद पवारांविरोधात उभे राहिले पण आता वाटतं का जी बंडखोरी केली ती चूक होती?
अजित पवार: मी बंडखोरी वैगरे काही केली नाही. तुम्ही चुकीचं विचारत आहेत. जे घडलंय त्याला एक वर्ष उलटून गेलं. तोच पुन्हा विचारण्यात काही अर्थ नाही. मी तेव्हा सांगितलं होतं की, जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार जाणार होतं तेव्हा मी मंत्रालयात बसलो होतो. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार माझ्याकडे आले.
त्या सर्वांनी एक पत्र तयार केलं आणि त्यावर सह्या केल्या. तेव्हा आमचे मंत्री राजेश टोपे यांनी ते पत्र पवार साहेबांना दिलं. आता जे आमदार साहेबांसोबत आहेत त्यांच्याही सह्या त्या पत्रावर आहेत आणि माझ्यासोबत ते आमदार आहेत त्यांच्याही सह्या त्यावर होत्या.
असं म्हणत अजित पवार यांनी मुलाखतीत हे स्पष्ट केलं की, सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंविरोधात निवडणुकीला उभं करण्याचा निर्णय हा त्यांचा स्वत:चा होता.
ADVERTISEMENT