Election Results 2024: हरियाणात BJP चा उलटफेर, काश्मीरमध्ये काय घडतंय?

मुंबई तक

08 Oct 2024 (अपडेटेड: 08 Oct 2024, 10:51 AM)

Haryana, J&K Election Results 2024 Live Updates: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली असून. दोन्ही राज्यातील मतमोजणीमध्ये प्रचंड चुरस दिसून येत आहे.

हरियाणात, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकाल

हरियाणात, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकाल

follow google news

बातम्या हायलाइट

point

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू

point

हरियाणामध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी

point

दोन्ही राज्यात भाजप पिछाडीवर

Haryana, Jammu-Kashmir Assembly Election Results: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, हरियाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत होतं, तर भाजप प्रचंड पिछाडीवर होतं. पण अचानका काही फेऱ्यानंतर काँग्रेस पिछाडीवर गेली आणि भाजपने निर्णायक आघाडी घेतली. अचानक झालेला हा उलटफेर काँग्रेससाठी धक्का मानला जाते आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि काँग्रेस आघाडीमध्ये लढत आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसल्याचे सुरुवातीच्या कलांवरून स्पष्ट झाले आहे. म्हणजे डबल इंजिनचे सरकार असल्याचा दावा करणारी भाजप आता डबल झटका बसला आहे. (double trouble for double engine bjp is facing defeat in haryana mathematics is also messed up in jammu and kashmir)

हे वाचलं का?

हरियाणात भाजपने घेतली निर्णायक आघाडी

हरियाणात भाजप गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत आहे. आपण तिसऱ्यांदा विजय मिळवू अशी भाजपला आशा आहे. त्यातच, हरियाणातील नागरिकांनी भाजपच्या पारड्यात आपलं मत टाकल्याचं तूर्तास पाहायला मिळतंय. हरियाणामध्ये 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात 65% पेक्षा जास्त मतदान झाले होते. यावेळी हरियाणा निवडणुकीत 67.9% मतदान झाले.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election : अजित पवारांचं ठरलं! बारामतीतून विधानसभा लढणार?

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला मोठा झटका

2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा भाजपने पीडीपीसोबत सरकार स्थापन केले होते. पण पीडीपीला दिलेला पाठिंबा काढून घेत भाजपने तेथील सरकार पाडलं होतं. त्यानंतर अनेक वर्ष जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या. 2019 साली 370 कलम हटवल्यानंतर यंदा प्रथमच काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येत. पण या निवडणुकीत  सुरुवातीच्या कलांमध्ये येथेही भाजपला फटका बसल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा>> Jammu and Kashmir Haryana Assembly Election Results 2024: हरियाणामध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत! जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती काय?

जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले, तर हरियाणाच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात म्हणजे 5 ऑक्टोबरला मतदान झाले. एकीकडे हरियाणात भाजप हॅटट्रिकची अपेक्षा करत असताना दुसरीकडे काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका 2014 मध्ये झाल्या होत्या. यामुळे यंदाची  निवडणूक ही अनेक अर्थांनी खास आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ही निवडणूक लढवत आहेत, तर भाजप एकटंच लढत आहे.

जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांवर तीन टप्प्यात मतदान झाले. येथे पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान झाले. तीनही टप्प्यात एकूण 63.45 टक्के मतदान झाले. यावेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती करून निवडणूक लढवली, तर मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) एकाकी लढत आहेत.

    follow whatsapp