मोठी बातमी! फडणवीस भेटले पण शिंदे 'अजूनही' अडून बसले, आता थेट शाहांना...

ऋत्विक भालेकर

• 08:03 PM • 04 Dec 2024

Eknath Shinde Home Department: जोपर्यंत गृह खातं मिळणार नाही तोपर्यंत सरकारमध्ये सामील होणार नाही. अशी ताठर भूमिका आता एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

एकनाथ शिंदेंना हवं गृहमंत्री पद (फाइल फोटो)

एकनाथ शिंदेंना हवं गृहमंत्री पद (फाइल फोटो)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे अजूनही गृहमंत्री पदासाठी अडून बसले

point

देवेंद्र फडणवीसांनी 'वर्षा'वर जाऊन केली चर्चा

point

गृहमंत्री पद न मिळाल्यास सत्तेत सामील न होण्याचा शिंदेंचा मानस

Eknath Shinde: मुंबई: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही एकनाथ शिंदे हे मात्र अद्यापही गृहमंत्री पद मिळावं यासाठी अडून बसल्याचं आता समोर आलं आहे. काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी 'वर्षा'वर जाऊन साधारण तासभर एकनाथ शिंदे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. पण या चर्चेतून अद्यापही कोणतंच फलित हाती आलेलं नाही. कारण गृहखात्यासाठी एकनाथ शिंदे हे ठाम असल्याचं समजतं आहे. (eknath shinde insistent on home department along with the deputy cm post or else he is not willing to be part of government)

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे 'यासाठी' बसले अडून

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तब्बल तासभर चर्चा केली. ज्यामध्ये उपमुख्यमंत्रिपदासह गृहखात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे हे अद्यापही ठाम आहेत. जर गृहखातं मिळणार नसेल तर ते आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत यावर ते ठाम आहेत. या मागणीनंतर, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या मागणीबाबत भाजप हायकमांडशी बोलण्याचे आश्वासन यांनी दिलं आहे.

हे ही वाचा>> Inside Story: फडणवीस 'वर्षा'वर.. शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा, शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही?

शिंदेंची नेमकी अडचण काय? 

विधानसभा निवडणुकीत भाजपला अनपेक्षितरित्या 132 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे आता भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी मागणी भाजपमधून जोरकसपणे सुरू झाली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार निवडून आलेले असतानाही सरकार स्थापनेसाठी भाजपला त्यांची फारशी गरज भासणार नव्हती. पण आपल्या चेहऱ्यावर निवडणुका लढविल्या गेल्या त्यामुळे आपल्याच मुख्यमंत्री करण्यात यावं अशी शिंदेंची मागणी असल्याची मागणी होती.

मात्र, भाजपकडे असणाऱ्या आमदारांचं संख्याबळ हे प्रचंड होतं आणि त्यापुढे शिंदेंची ही मागणी टिकणं अवघड होतं. त्यामुळेच शिंदेंना मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडावा लागला. पण जर मुख्यमंत्री पद नसेल तर भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेशी लढा देणं हे शिंदेंना जड जाऊ शकतं.

हे ही वाचा>> Vinod Kambli Song : शेजारी सचिन तेंडुलकर, राज ठाकरे आणि विनोद कांबळीचं गाणं, सगळेच गहिवरले!

अशावेळी मुख्यमंत्री पदाच्या तोलामोलाचं असलेलं गृह खातं आपल्याला मिळावं यासाठी शिंदे अडून बसले. पण भाजप हे खातं सोडण्यासही तयार नाहीत. हीच शिंदेंची खरी अडचण झाली आहे. 

पत्रकार परिषदेत फडणवीसांनी शिंदेंना काय म्हटलेलं? 

राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये फडणवीस म्हणाले की, 'मागील काळातही आम्ही एकत्रितपणे निकाल घेतले आहेत. पण मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद ही एक प्रकारची तांत्रिक व्यवस्था आहे. आम्ही आतापर्यंत एकत्रितपणे निर्णय घेत आले आहोत. पुढेही तसेच निर्णय घेतले जातील असा मला विश्वास आहे.' 

'मी स्वत: काल मुख्यमंत्री एकनाथराव यांना भेटून त्यांना विनंती केली की, त्यांनी शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळात राहावं. मी त्यांना हे देखील सांगितलं की, शिवसेनेच्या आमदारांची, महायुतीच्या आमदारांचीही इच्छा आहे. त्यामुळे त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळेल. अशी मला पूर्ण खात्री आहे.' असं ते म्हणाले.

    follow whatsapp