Satara News : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Minister Shambhuraj Desai) कराड दौऱ्यावर असताना , त्यांच्याच शिवसेनेचे तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव (Kakasaheb Jadhav) यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना चहा प्यायला बोलवले होते. मात्र ते आले नसल्याने संतप्त झालेल्या काकासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावरच (Social Media) शिवीगाळ केल्याने कराड शहर पोलिसात गणपतराव शिंदे-पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काकासाहेब जाधवची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT
व्हाट्सॲपवर ग्रुपवर वाद
याबाबत पोलिसांनी सांगितले की, व्हाट्सॲपवर ‘शिवसेना एकनाथ शिंदे’ नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये शिंदे गटातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आहेत. शिवसेनेचा तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव हाही त्या ग्रुपमध्ये आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काकासाहेब जाधव याने संबंधित सोशल मीडिया ग्रुपवर पालकमंत्री शंभुराज देसाई यांना उद्देशून अपशब्द वापरले. अश्लिल भाषेत त्याने त्या ग्रुपवर शिवीगाळ केली.
हे ही वाचा >> Mumbai Crime : “आमच्यावर ऑफिसमध्ये बलात्कार, गर्भपात…”, आठ महिला पोलिसांच्या पत्राने खळबळ
मंत्र्यांची प्रतिमा मलिन
काकासाहेब जाधवच्या या कृत्यामुळे संबंधित ग्रुपमध्ये असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना तसेच इतरांना लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरुन त्याने मंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे गुलाबराव शिंदे यांनी रविवारी पहाटे कराड शहर पोलीस ठाण्यात काकासाहेब जाधव विरोधात फिर्याद दाखल केली.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
त्यानुसार पोलिसांनी काकासाहेब जाधव याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी करीत आहेत. या प्रकारामुळे मात्र सातारा जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT