Sharad Pawar Resignation Politics: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कोअर कमिटीच्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा फेटाळण्यात आला आणि त्यानंतर शरद पवारांनी देखील आपला निर्णय मागे घेत कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर केला. पण पवारांनी केलेल्या या संपूर्ण राजकारणाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. पण या सगळ्या राजीनाम्याच्या राजकारणातून पवारांनी नेमकं काय मिळवलं? याबाबत बरीच चर्चा सुरू झाली आहे. (first the announcement then the u turn what sharad pawar actually got from resignation politics)
ADVERTISEMENT
तीन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, आणखी एक महत्त्वाची घोषणा करत पवार यांनी समितीचीही स्थापना केली होती. ही समिती बैठक घेऊन नवा अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले होते. त्यावेळी सर्व नेत्यांनी पवार यांना राजीनामा मागे घेण्यास सांगितले. मात्र त्यांनी राजीनामा परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले होचे. मात्र नवीन अध्यक्ष निवडण्याऐवजी त्याच समितीने आम्ही तुमचा राजीनामा फेटाळत असल्याचा ठराव केला. दरम्यान, समितीच्या प्रस्तावावर विचार करत पवार यांनीही आपला निर्णय मागे घेतला.
हे ही वाचा >> NCP: शरद पवारांच्या ‘हनुमंती’ डावाने अजितदादांचा केला ‘करेक्ट कार्यक्रम?’
पवारांच्या राजीनाम्याचा अर्थ काय?
या राजीनाम्याबाबत राजकीय विश्लेषक वेगवेगळे अर्थ काढत आहेत. निवडणूक आयोगाने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता, तेव्हा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदी राहण्यात काही अर्थ नाही, असे वाटू लागले असावे. राजीनाम्यानंतर विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे पवारांना फोन करून शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यावरून आजही त्यांचा राष्ट्रीय स्तरावर किती दबदबा आहे, हे स्पष्ट झाले. नितीश कुमार विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असताना शरद पवारांनी जी चाल खेळली ती पाहता त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते आणि हेच इतर पक्षाचे नेतेही त्यांना सांगत होते.
एका दगडात अनेक पक्षी
राजीनाम्याचा निर्णय घेताना शरद पवारांनी पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा केली नाही. तर फक्त कुटुंबातील चार सदस्यांशी म्हणजेच पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे आणि पुतणे अजित पवार यांनाच याची माहिती दिली होती. महाराष्ट्रात अजित पवार हे शरद पवारांचे उत्तराधिकारी मानले जातात. राजीनाम्यापूर्वी अजित पवार बंडखोरी करू शकतात आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशा बातम्या येत होत्या.
हे ही वाचा >> Ajit Pawar: अजितदादा पुन्हा नाराज?, शरद पवारांच्या ऐतिहासिक घोषणेवेळी होते गैरहजर
अशा परिस्थितीत ते या पदावर राहिले असते आणि पक्षात फूट पडली असती, तर शिवसेनेसारखी परिस्थिती उद्भवू शकली असती, त्यामुळे पवारांच्या प्रतिमेलाही तडा गेला असता. आता राजीनामे दिल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की, पक्षातील सर्व नेते एकवटले आणि मंचावरच राजीनामे परत घ्या असे म्हणू लागले. दुसरे म्हणजे, यातून त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा आपणच असल्याचे दाखवून दिले.
राजीनाम्याच्या घोषणेने काय साध्य झाले?
पवारांच्या राजीनाम्यामुळे आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या वर्षभर आधी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रीय विरोधकांना एकसंध ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. पवार हे सध्या महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत. म्हणजेच पवारांनी विरोधकांना, पक्षातील संभाव्य फुटीचा संदेश देण्याव्यतिरिक्त उत्तराधिकाऱ्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
– राष्ट्रवादीतील शिवसेनेसारखी संभाव्य बंडखोरी शमली आहे.
– पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निष्ठावंत मतदार कोणाच्या पाठीशी उभे आहेत, हे स्पष्ट झाले.
– महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे वर्चस्व सर्वाधिक असल्याचे सिद्ध झाले आहे.
ADVERTISEMENT