मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार आणि खासदार हे अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये आपला पक्ष विलीन करण्याची मागणी करत असल्याची जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशावेळी शरद पवार यांनी आता त्यांची नेमकी भूमिका काय असणार हे स्पष्ट केलं आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बैठक पार पडली. ज्यामध्ये शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचं पुढील राजकारण कसं असेल हेच पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
ADVERTISEMENT
'मी थोडा अस्वस्थ होतो कारण सहकारी लोकांची अपेक्षा काय आहे? विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय सुरू असेल असा प्रश्न होता मात्र कालपासून विद्यार्थी महिलां युवक यांच्या बैठका पार पडल्या आणि त्यानंतर माझा विश्वास वाढला.' असं म्हणत शरद पवारांनी आपला पक्ष विलीन होणार नसल्याचं एक प्रकारे म्हटलं होतं.
शरद पवारांचं भाषण जसच्या तसं...
मी थोडा अस्वस्थ होतो कारण सहकारी लोकांची अपेक्षा काय आहे? विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय सुरू असेल असा प्रश्न होता माञ कालपासून विद्यार्थी महिलां युवक यांच्या बैठका पार पडल्या आणि त्यानंतर माझा विश्वास वाढला. निवडणुकीत अपयश आलं आहे तरी खचून गेले आहेत असं चित्रं दिसलं नाही. मी विचार करतं होतो की मागील ६० वर्ष नेहरू गांधी विचारांची काय परिस्थीत होती? एक वर्ष असं होतं की काँग्रेस पक्ष राज्यात साफ झाला होता. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे एखादी दुसरी जागा निवडून आली होती.
धुळे, नाशिक, जळगाव येथे 100 टक्के पराभव झाला होता. 1957 ची परिस्थीत होती. मात्र त्यानंतर 1972 साली परिस्थीत बदलली आणि जी निवडणूक झाली 288 पैकी 230 जागा काँग्रेसला मिळाल्या. 1980 साली निवडणुका झाल्या माझ्या नेतृत्वाखाली 58 ते 59 लोकं निवडून आल्या. मी काही कारणासाठी इंग्लंडल गेलो, माघारी आलो त्यावेळी केवळ 6 राहिले.. बाकी निघून गेले मी त्यावेळीं पुनः संघटना बांधली आणि त्यानंतर 72 जागा निवडून आल्या. परिस्थीत बदलत असते त्यामुळे मागे हाटायचं नसतं.
आज सकाळपासून मी पाहतो आहे सर्वांची भूमिका ही आलेल्या संकटावर मात करण्याची आहे. लोकसभा निवडणुकीत 8 लोक निवडूण आले परंतु त्यानंतर असं काय झालं? आम्ही लोकसभा निवडणुकीनंतर संतुष्ट झालो होतो. परंतु ज्यांचा पराभव झाला त्यांनी मात्र याची गंभीर दखल घेतली. त्यांनी काही योजना काढल्या. शेतकरी वीज माफ करण्याचं निर्णय घेतला. 2 कोटी 37 लाख भगिनींना सरकारी तिजोरीतील पैसा वाटला. लोकसभा विधानसभा निवडणुकीत पैसा वाटला जातो. यांनी सरकारी तिजोरीतील पैसा विधानसभेला वाटला आणि त्यांचा विजय झाला.
त्यांनी हिंदुत्व हा मुद्दा काढला. भाजप हा पक्ष असा आहे की आयुष्यभर पक्षासाठी वाहून घेणारे लोक आहेत. त्यांची आरएसएस संघटना, विद्यार्थी परिषद संघटना उभ्या केल्या. त्यांनी आपला आयुष्याचा महत्त्वाचा कालावधी संघटनेसाठी खर्च केला. अशी लोक तिथं आहेत.
माझा एक मित्र मला आसामला भेटला. त्याला मी विचारलं इथ काय करतो.. तर तो म्हणाला, मला संघाने सांगितलं की 20 वर्ष तू आसाममध्ये द्यायची. मी म्हटलं तू घर कसं चालवतो.. तर तो म्हणाला कुटुंबाला 450 रुपये संघ देतो आणि अडीचशे रुपये मला देतात.
सहा महिन्यानंतर तो मला म्हणाला संघाने मला अता पुण्यात जबाबदारी दिली आहे. तिथं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इथं नेमलं. संघाने तिथं आयुषभर घालवण्याची सोय केली आहे. संघ आयुष्याची महत्वाची वर्ष कार्यकर्त्याने घालवल्या नंतर देखील तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.. संघाने त्याच्यावर एक मोठी जबाबदारी आयुष्यभरासाठी दिली.
मी नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात होतो. तिथं बाबरी मस्जिद विषयावरून वाद सुरु होता. तिथं बाबरी विषय सोडवावा यासाठी दोघांची निवड करण्यात आली. एक मी आणि दुसरे भैरवसिंह शेखावत यांचा सामावेश होता. आम्हाला त्यांनी मार्ग काढण्यासाठी सांगितलं. तिथं दोन समित्या होत्या, राम जन्मभूमी न्यास आणि बाबरी ॲक्शन कमिटी. राम जन्म भूमी न्याससाठी हेगडे नावाचे गृहस्थ होते. त्यांच्याशी संवाद ठेवण्याचं काम माझ्याकडे होतं. मी हेगडे यांना विचारलं मी तुम्ही या कामात किती वर्ष आहात. ते म्हणाले 40 वर्ष आहे. राम जन्म भूमी होती की नव्हती याबाबत संशोधन करण्याठी एक संघटना होती त्याचं काम त्यांच्यावर होतं.
16 हजार पदवीधर तयार करणं त्यांना त्याचा अभ्यास करायला लावणं आणि त्यांना नोकरीला लावणं हे काम त्यांच्यावर होत. आरएसएसच एक माणूस घरटी जात होता आणि हिंदूची काय अवस्था आहे हे सांगत होता. आरएसएसच्या लोकांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणीं जाऊन केलं. याचा आर्थ काय तर हिंदुत्व ठसवण्याचं काम त्यांनी केलं. घरातील गृहिणींना त्यानी हे जाऊन सांगितलं. निवडणुकीत काळात हे अधिक केलं यासोबतच पैसा प्रचंड वाटला.
ADVERTISEMENT
