Who Is Ram Sutar : राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा केली. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याबाबत सातत्याने मागणी केली जात होती.
ADVERTISEMENT
कोण आहेत राम सुतार? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार अशी ख्याती असलेल्या राम वनजी सुतार यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातील सर्वात उंच (स्टॅच्यू ऑफ युनिटी) 182 मीटरचा पुतळा सुतार यांनी उभारला आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात त्यांना नावलौकीक मिळालं आहे. 19 फेब्रुवारी 1925 हा राम सुतार यांचा जन्मदिवस. धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावी त्यांचा जन्म झाला. श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राम सुतार यांनी शिल्पकलेचे धडे गिरवले. इतकच नाही तर सुतार यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्येही शिक्षण घेतलं.
तसच सुतार यांनी 1959 मध्ये दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात कामही केले. काही वर्ष नोकरी केल्यानंतर सुतार यांनी शिल्पकार म्हणून काम करण्याचा निश्चय केला. शिल्पकलेचा दांडगा अनुभव घेतल्यानंतर राम सुतार यांनी दिल्ली शिल्पकलेचा स्टुडिओ उभारला. शिल्पकलेच्या ज्ञानाच्या जोरावर सुतार यांनी अनेक ऐतिहासिक पुतळे उभारले आहेत. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा डिझाईन तयार केला आहे. भारतीय कला संस्कृतीत सुतार यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राम सुतार यांना 2016 आणि 1999 पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. सुतार यांनी त्यांच्या 60 वर्षांच्या करिअरमध्ये 50 हून अधिक मूर्त्या बनवल्या आहेत.
हे ही वाचा >> Nagpur Violence : दंगलीची पोस्ट, बांगलादेश ते थेट फेसबूक कंपनीशी संपर्क... नागपूर सायबरसेलनं सगळंच काढलं
यामध्ये संसदेत असलेल्या महात्मा गांधी यांच्या मूर्तीचाही समावेश आहे. या मूर्तीच्या प्रतिमा इंग्लंड, फ्रान्स आणि रशियासारख्या दूसऱ्या देशांमध्येही पाठवण्यात आल्या होत्या. परंतु, स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवणं ही त्यांच्या जीवनातील उल्लेखनीय कामगिरी आहे. सुतार यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1952 मध्ये प्रमिलासोबत विवाह केला. त्यांचा मुलगा अनिलही मूर्तिकार आहे. श्रीराम कृष्ण जोशी यांनी सुरुवातीच्या काळात सुतार यांना मार्गदर्शन केलं. जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1953 मध्ये त्यांनी मेयो गोल्ड मेडल जिंकलं. 1954 ते 1958 या कालावधीत सुतार यांनी अजंठा आणि एलोरा लेणीवर ऐतिहासिक कोरीव काम केलं.
हे ही वाचा >> Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन तरुणाला घेरून मारलं, तीच पद्धत आणि तसाच व्हिडीओ व्हायरल, प्रकरण काय?
CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
"महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचं स्वरुप रक्कम रुपये 25 लाख, मानपत्र, मानचिन्ह व शाल अशी आहेत. दिनांक 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. राम सुतार साहेब यांचं वय 100 वर्षे आहे. ते अजूनही शिल्प तयार करत आहेत. विशेषत: चैत्यभूमीचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतंय, त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्तीदेखील तेच तयार करत आहेत", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात म्हणाले.
ADVERTISEMENT
