केंद्रीय निवडणूक आयोगाने 14 सप्टेंबरला राष्ट्रवादी फुट पडल्याची माहिती दिली होती. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी दावे आल्याने निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फुट पडल्याचे जाहिर केले होते. यानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार (Sharad pawar) आणि अजित पवार (Ajit pawar) गटाला येत्या 6 ऑक्टोबरला सुनावणीस बोलावले आहे.या सर्व घडामोडींवर गेल्या काही दिवसांपासुन राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याने प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य केले आहे. (jayant patil reaction on election commision ncp split decision sharad pawar vs ajit pawar maharashtra politics)
ADVERTISEMENT
जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फुट पडल्याचे जाहिर केल्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात शरद पवारांनी निवडणूक आयोगाला स्पष्ट सांगितले होते की, आमच्या पक्षात फुट नाही. तसेच आमची साथ सोडून गेलेल्या नेत्यांनी कोणताच आक्षेप घेतला नाही आहे, कोणत्याच धोरणाला विरोध देखील केला नव्हता. त्यामुळे जर या दोन गोष्टी होत असतील, तर ती फुटीची गोष्ट नाही आहे. निवडणूक आयोगाने जर आम्हाला संधी दिली, तर आम्ही आमच्या सर्व गोष्टी आणि आमचं म्हणण मांडू,अशी विनंती शरद पवारांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
हे ही वाचा : Women Reservation Bill : लोकसभा, विधानसभेच्या जागांचं समीकरण बदलणार; विधेयकात काय?
शरद पवार यांनी पत्र लिहून देखील त्यांनी अंतिम निर्णय़ घेतला. आम्हाला पक्षात फुट दिसतेय. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीवरील सुनावणीसाठी 6 ऑक्टोबरला हजर राहा, असे निवडणूक आयोग म्हणाले आहेत. याचाच अर्थ पुर्वग्रहदुषित मन आहे का, असे अनेकांना वाटते. तसचे निवडणूक आयोगाने शरद पवारांना त्यांची बाजू ठेवण्याची एक संधी दिली पाहिजे होती, असे मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
काहीच दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले की, सर्वांच्या मनात हीच शंका आहे. त्यामुळेच शरद पवांरांना संधी देण्याची आवश्यकता होती. ती संधी न देता थेट तारीखच दिली. त्यामुळे तुमच्या म्हणण्यात काही दम आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
सोमवारी आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले होते. यावर जयंत पाटील म्हणाले, रिझनेबल टाईमचा (वाजवी वेळेत) गैरफायदा घेतला जाऊ नये, अशी सुप्रीम कोर्टाची अपेक्षा दिसतेय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने यावर अजूनही अॅक्शन घेतली नाही, फक्त नोटीसाच बजावल्या आहेत, असे लक्षात आले आहे. तसेच सर्वांच्च न्यायालयाने त्यांची मत व्यक्ती केली आहेत. राहुल नार्वेकर त्यावर विचार करतील आणि लवकरात लवकर तारखा देऊन हा निर्णय निकाली काढतील, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीच्या सुनावणीबद्दल बोललो होतो.त्यावेळी त्यांनी कारवाई सुरु करण्याचे आश्वासन दिले होते.
ADVERTISEMENT