No-Confidence Motion: नवी दिल्ली: मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. या अविश्वास प्रस्तावावर आज संसदेत शेवटच्या दिवशी चर्चा होतेय. या चर्चेत आज केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना कॉग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर निषाणा साधला होता. या सोबत ज्योतिरादित्य सिंधिया दोन वर्षात बदलेल असा आरोप काँग्रेसच्या खासदारांनी केला होता. या आरोपावर माझं तोंड उघडायला लावू नका असे प्रत्युत्तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला दिले आहे. (jyotiraditya scindia criticize rahul gandhi and congress mp no confidence motion)
ADVERTISEMENT
राहुल गांधीवर निशाणा
ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्या संसदेतील भाषणा दरम्यान म्हणाले की, राहुल गांधी म्हणतात, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मणिपूर हा भारताचा हिस्सा नाही. पण मोदींनी ईशान्येला जगाशी जोडले आहे, तर ईशान्येशी त्यांचे मनापासूनच नाते आहे, असा पलटवार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधींवर केला आहे. तसेच द्वेषाच्या राजकारणात प्रेमाचे दुकान आणू असे हे म्हणतात, पण यांचे दुकान हे भ्रष्टाचाराचे आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधींवर केली आहे. काँग्रेसच्या सरकारने आझादीपासून 67 वर्षात जे काम केले नव्हते, ते 9 वर्षात आम्ही करून दाखवले आहे, असा विश्वास देखील ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : No Confidence Motion : सर्व रेकॉर्ड मोडून 2024 मध्ये परत येऊ; PM मोदींचा पलटवार
ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की, चांगली गोष्ट आहे की आज यांना रामाची आठवण आली, कुणी जेनेऊधारी आहे, तर कुणी देवळात जाणारा आहे, पण यांचा हा मुखवटा जास्त दिवस चालणार नाही, असा हल्लाबोल ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर केला. तसेच दोन वेळा तुम्हाला जनतेने नाकारले आहे, आणि तिसऱ्यांदाही प्रचंड बहूमताने नरेंद्र मोदी यांचेच सरकारच स्थापण होणार आहे, असा विश्वास देखील ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केला.
काँग्रेस खासदारांनी सिंधिया यांच्या भाषणा दरम्यान दोन वर्षातच बदलले? असा टोला लगावला होता. यावर सिंधिया म्हणाले की, तुम्हीच माझ्यात बदल केला आहे. कान उघडून ऐका, आता मला तोंड उघडायला लावू नका, असे थेट आव्हानच ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या खासदारांना दिले.
ADVERTISEMENT