“हायकमांडचा निरोप घेऊन आलोय, काँग्रेस ठाकरेंच्या खंबीरपणे पाठीशी” : के.सी. वेणुगोपाल

मुंबई तक

• 04:25 PM • 17 Apr 2023

के.सी. वेणुगोपाल यांनी आज (सोमवार) मातोश्री बंगल्यावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Congress Leader K.C. Venugopal met Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray at Matoshree Bungalow

Congress Leader K.C. Venugopal met Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray at Matoshree Bungalow

follow google news

मुंबई : मी इथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा संदेश घेऊन आलो आहे. संदेश स्पष्ट आहे. उद्धव ठाकरेजी (Uddhav Thackeray) लोकशाही विरोधी शक्तींविरोधात लढत आहेत. या लढ्यात काँग्रेस (Congress) पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विरोधी पक्षांना एकत्र लढायचे आहे हे एकमत आहे. विचारधारा वेगळ्या आहेत पण एकत्र लढण्याची गरज आहे, असं मत काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल (K.C. Venugopal) यांनी व्यक्त केलं. (Congress Leader K.C. Venugopal met Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray at Matoshree Bungalow)

हे वाचलं का?

के.सी. वेणुगोपाल यांनी आज (सोमवार) मातोश्री बंगल्यावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.

“राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी… “, ‘त्या’ चर्चेवर संजय राऊत स्पष्टच बोलले

के.सी. वेणुगोपाल पुढे म्हणाले, देशामध्ये अराजकता, हुकूमशाही सुरु आहे. ती संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मी इथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा संदेश घेऊन आलो आहे. संदेश स्पष्ट आहे, उद्धवजी लोकशाही विरोधी शक्तींविरोधात लढत आहेत. या लढ्यात काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही लढणार आहोत. आम्ही सोबत आहोत, हा मेसेज या भेटीतून आम्हांला द्यायचा आहे, असंही ते म्हणाले.

‘नळाबरोबर गाड्याची यात्रा’ : शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर काय म्हणाले ठाकरे?

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आमच्या भेटीचा उल्लेख वेणुगोपाल यांनी मोजक्या आणि स्पष्ट शब्दांत सांगितला. देशासमोरचा प्रश्न फार मोठा आहे. देशात सध्या मी आणि मीच सुरु आहे. या मी करणाविरुद्ध विरोधकांचं समीकरण जुळत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. निवडणुका जवळ आल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा मधल्या काळात बोलले की सर्वच पक्ष संपतील आणि भाजप हा एकमेव पक्ष राहिलं. जसे नरभक्षक असतात, तसे भाजपवाले सत्ताभक्षक झाले आहेत. पण शिवसेना देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरली आहे.

    follow whatsapp