Lok Sabha Opinion Poll 2024, NDA vs India Alliance : लोकसभा-2024 निवडणुकीत यश मिळवण्यासाठी एका बाजूने भाजप, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस तयारीला लागली आहे. दोन्ही पक्षांकडून प्रादेशिक आणि इतर पक्षांची मोट बांधत आघाडी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हॅटट्रिक करण्याची भाजपला आशा आहे, मात्र इंडिया आघाडी सक्षम पर्याय म्हणून समोर आली, तर काय होईल? असा प्रश्नही चर्चेत आहे. त्यातच आता एबीपी-सी व्होटरने केलेला एक सर्वेक्षण समोर आले आहे. यात पाच राज्यातील ओपिनियन पोलचे आकडे राजकीय चित्र कसे असेल, याबद्दल संकेत देताना दिसत आहे. (Lok Sabha Election 2024 Latest Opinion Poll of C voter)
ADVERTISEMENT
एबीपी सी-व्होटरने केलेल्या या सर्वेक्षणात तब्बल 2 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. केंद्रातील सत्तेत महत्त्वाच्या असलेल्या राज्यांत ओपिनियन पोल करण्यात आला आहे. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार या राज्यांचा समावेश आहे.
देशात जर आता लोकसभा निवडणूक झाली तर कोण जिंकेल, याबद्दल ओपिनियन पोलच्या अंदाज अवाक् करणारे आहेत. महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश मिळून लोकसभेच्या 223 जागा आहेत. त्यामुळे या जागाच केंद्रातील कुणाची सत्ता असेल हे ठरवतात.
ओपिनियन पोलचे कौल कुणाच्या बाजूने?
सी व्होटर ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार पंजाबमध्ये काँग्रेसची लहर दिसत आहे. पंजाबमधील 13 लोकसभा जागांवर जर आता निवडणूक झाली, तर भाजप 0 ते 2 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 5 ते 7, आम आदमी पार्टीला 4 ते 6, तर शिरोमणी अकाली दलाला 0 ते 2 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.
हेही वाचा >> Maharashtra Opinion Poll 2024 : मविआला लोकसभेच्या 28 जागा, महायुतीची झोप उडवणारा पोल!
आता किती मते मिळू शकतात, याबद्दल सांगायचं झालं, तर ओपिनियन पोलचे निष्कर्ष असे सांगतात की पंजाबमध्ये भाजपला 16 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला 27 टक्के, तर आम आदमी पार्टीला 25 टक्के मते मिळतील, असे या पोलचा अंदाज आहे. शिरोमणी अकाली दलाला 14 टक्के मते, तर अन्य पक्षांना 18 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
पंजाब : सी व्होटर ओपिनियन पोल (opinion poll 2024 Punjab)
एकूण जागा – 13
भाजप – 0 ते 2
काँग्रेस – 5 ते 7
आप – 4 ते 6
शिरोमणी – 0 ते 2
इतर – 00
कुणाला किती टक्के मते?
भाजप – 16 टक्के
काँग्रेस – 27 टक्के
आप – 25 टक्के
शिरोमणी – 14 टक्के
इतर – 18 टक्के
महाराष्ट्र : सी व्होटर ओपिनियन पोल (opinion poll 2024 Maharashtra)
एकूण जागा – 48
भाजप (महायुती) – 19 ते 21
काँग्रेस (मविआ) – 26 ते 28
इतर – 0 ते 2
महाराष्ट्रात कुणाला किती मते?
भाजप (महायुती) – 37 टक्के
काँग्रेस (मविआ) – 41 टक्के
इतर – 22 टक्के
पश्चिम बंगाल : सी व्होटर ओपिनियन पोल
एकूण जागा – 42
भाजप – 16 ते 18
टीएमसी – 23 ते 25
काँग्रेस – 0 ते 2
इतर – 00
कुणाला किती मते मिळू शकतात
भाजप – 39 टक्के
टीएमसी – 44 टक्के
काँग्रेस – 8 टक्के
इतर – 9 टक्के
बिहार : सी व्होटर ओपिनियन पोल
एकूण जागा – 40
भाजप (NDA) – 16 ते 17
काँग्रेस (India) – 21 ते 23
इतर – 0 ते 2
कुणाला किती मते मिळणार?
भाजप (NDA) – 39 टक्के
काँग्रेस (India) – 43 टक्के
इतर – 18 टक्के
उत्तर प्रदेश : सी व्होटर ओपिनियन पोल
एकूण जागा – 80 जागा
भाजप (NDA) – 73 ते 75
काँग्रेस (सपा) – 4 ते 6
बसपा – 0 ते 2
इतर – 00
कुणाला किती मिळू शकतात मते?
भाजप (NDA) – 49 टक्के
काँग्रेस (सपा) – 35 टक्के
बसपा – 5 टक्के
इतर – 11 टक्के
ADVERTISEMENT