Lok Sabha: विरोधकांची बोलती बंद, एकाच वेळी 33 खासदार तडकाफडकी निलंबित.. घडलं तरी काय?

मुंबई तक

• 11:43 AM • 18 Dec 2023

लोकसभेतील गदारोळ प्रकरणी विरोधी बाकावरील 33 खासदारांना निलंबित करण्यात आला आहे. हे निलंबन आता हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत असणार असल्याचे सांगून निलंबनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

loksabha 33 mp suspended speaker of the loksabha for rioting Adhir Ranjan Chaudhary

loksabha 33 mp suspended speaker of the loksabha for rioting Adhir Ranjan Chaudhary

follow google news

MP suspended : लोकसभेत (Loksabha) विरोधी खासदारांनी केलेल्या गदारोळावरून लोकसभेच्या अध्यक्षांनी आज कडक कारवाई करत 33 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. विरोधी खासदारांनी सरकारविरोधी फलक दाखवल्यामुळे लोकसभा अध्यक्षांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस नेते (Congress Leader) अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांचा समावेश असून हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री (Union Parliamentary Affairs Minister ) प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी विरोधी खासदारांच्या निलंबनाची (MP suspended) मागणी करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंल लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे. याआधी शुक्रवारी 13 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्यानंतर आतापर्यंत विरोधी पक्षातील 44 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

फलक आणि घोषणा

विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत लोकसभा स्थगित करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना सभागृहात फलक आणू नयेत अशी विनंती केली होती. मात्र संसदेच्या सुरक्षेतील कमतरतेवर बोट ठेवत विरोधी पक्षातील खासदारांनी फलक दाखवून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

हे ही वाचा >> भाजप महाराष्ट्रात नेतृत्व बदलणार?, विनोद तावडेंचं कोणाकडे बोट?

विरोधकांचा आवाज दाबला

सरकारच्या या कारवाईनंतर विरोधकांकडूनही सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, सरकारचे काम सभागृह चालवणे असून आम्हाला निलंबित करून आमचा आवाज दाबला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तर त्याचवेळी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी सांगितले की, सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुरेक्षेच्या त्रुटींवरून हंगामा

या सगळ्या गोष्टीतून सरकारला गृहमंत्री अमित शहा यांना वाचवायचे आहे, त्यामुळे ही आमच्यावर कारवाई केली जात असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे. तर लोकसभा अध्यक्षांनी केलेल्या कारवाईवर अधीर रंजन चौधरी म्हणाले की, संसदेतील सुरक्षेच्या त्रुटींवरूनच आम्ही सरकारला सवाल करत होतो तर त्याचवेळी गेल्या दोन दिवसांपासून यापूर्वी निलंबित केलेल्या खासदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणीही करत होतो. मात्र सरकारने आमच्यावर कारवाई करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

निलंबित झालेले खासदार

लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे अध्यक्ष कल्याण बॅनर्जी, ए. राजा, दयानिधी मारन, के. जयकुमार, अबुरूपा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, ई.टी. मोहम्मद बशीर, जी. सेल्वम, सी.एन. अण्णा दुराई, अधीर रंजन चौधरी, डॉ. टी. सुमाथी, के नवस्कानी, के वीरस्वामी, एन. च्या. प्रेमचंद्रन, सौगता रॉय, शताब्दी रॉय, असित कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटो अँटोनी, एस. एस. पलानिमनिकम, अब्दुल खलीफ, थिरुवुकारशर, विजय वसंत, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस. रामलिंगम, के सुरेश, अमर सिंग, राजमोहन उन्निथन, गौरव गोगोई, टी.आर. वाळू या खासदारांचे निलंबन करण्यात आले असून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Salim Kutta: ‘त्यांचं’ नाव घेतलं तर तुम्हाला एवढ्या का मिरच्या लागल्या?, खडसेंचे प्रचंड गंभीर आरोप

 

    follow whatsapp