Cabinet Meeting: मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत (Cabinet meeting)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन अत्यंत मोठे असे निर्णय घेतले आहेत. पण मंत्रिमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या या बैठकीला राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे गैरहजर असल्याने उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. (maharashtra cabinet meeting cm eknath shinde dcm devendra fadnavis took two big decisions in ajit pawar absence)
ADVERTISEMENT
मागील काही दिवसांपासून अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अस्वस्थ असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशावेळी अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, असं असलं तरी अजित पवार हे फक्त आजारी असल्याने बैठकीला हजर राहिले नाही. असं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा >> Crime : दुधात विष मिसळलं अन्…, तीन सख्ख्या बहिणींचा आई-वडिलांनीच का घेतला जीव?
पण अजित पवार यांच्या या गैरहजेरीने आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे अजित पवार हे सरकारमध्ये अर्थमंत्री असल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांची बरीच अडचण होत असल्याचं सध्या बोललं जात आहे. त्यातूनच अजित पवारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशावेळी अजित पवार आता नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले अत्यंत महत्त्वाचे निर्णय:
- दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश – (अन्न व नागरी पुरवठा)
- विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ – (ऊर्जा विभाग)
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ – (अल्पसंख्याक विकास विभाग)
- नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी – (विधी व न्याय)
- इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा – (गृहनिर्माण)
राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (3 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत दिले.
हे ही वाचा >> Nanded Hospital : नांदेडमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू का झाला? खरंच औषधी नव्हती का?
पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.
नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले.
ADVERTISEMENT