Opinion Poll 2024 Maharashtra : राऊतांनी सांगितलं ‘मविआ’चं लोकसभेचं टार्गेट

भागवत हिरेकर

25 Dec 2023 (अपडेटेड: 25 Dec 2023, 05:42 AM)

maharashtra loksabha election 2024 survey : महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गट यांच्या महायुतीचे सरकार आहे. मात्र, लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीच्या जागा घटणार असल्याचे आकडे ओपिनियन पोलमधून समोर आलेत.

Sanjay Raut first Reaction on Maharashtra Lok Sabha Election Opinion Poll 2024

Sanjay Raut first Reaction on Maharashtra Lok Sabha Election Opinion Poll 2024

follow google news

Maharashtra Opinion Poll 2024 Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या एका ओपिनियन पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या चिंतेत भर घातली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा महाविकास आघाडी सरस ठरणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी मविआचं जागांचं टार्गेट जाहीर केलं.

हे वाचलं का?

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एबीपी-सी व्होटर्स ओपिनियन पोलबद्दल प्रश्न विचारण्यात आला. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत 26-28 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.

हेही वाचा >> “…तर अजित पवार कोणत्याच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत”

त्यावर संजय राऊत म्हणाले, “मला आता कुणीतरी 28 आकडा सांगितला. पण, आम्ही जी तयारी केली आहे ती किमान 35-40 जागा जिंकण्याची. हा पहिला सर्व्हे असेल, त्यांचा. काही प्रमुख नेते आता शिवसेना- महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत. लोकसभेच्या दृष्टीने… ती गणितं बदलणार आहेत. आम्ही किमान 40 जागांवर लोकसभेच्या निवडणुका जिंकू, असा आम्हाला आत्मविश्वास आहे.”

Sanjay Raut : “जो पक्ष दोन कुबड्यांवर उभा…”

“भाजपच्या मिशन 45 बद्दल राऊत म्हणाले, “भाजप मिशन 145 पण करू शकतं. भाजपचं मला सांगू नका, ते देशात लोकसभेच्या 1000 जागा जिंकतील आणि महाराष्ट्रात 148 जिंकतील. भाजप हा हवेतील पक्ष आहे, तो जमिनीवरचा पक्ष नाहीये. जो पक्ष दोन कुबड्यांवर उभा आहे… मिंधे आणि अजित पवार, त्यांनी 45 जागा जिंकण्याची भाषा करावी, हे हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला. तुम्ही कुठे आहात?”, असा सवाल राऊतांनी भाजपला केला.

हेही वाचा >> मविआला लोकसभेच्या 28 जागा, महायुतीची झोप उडवणारा पोल!

“सर्व्हे वगैरे बाजूला ठेवा. मी महाविकास आघाडीच्या वतीने सांगतोय, 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे. तुम्ही सर्व्हे करा. सर्व्हे करू नका. आम्ही सर्व्हे करत नाही. पण, आम्ही 40 पेक्षा जास्त जागा हे आमचं मिशन नसून हा आमचा आत्मविश्वास आहे”, संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

सी व्होटर्स ओपिनियन पोलचा अंदाज काय?

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहे. ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार 48 जागांपैकी सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा निष्कर्ष सर्व्हेतून समोर आला आहे. महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळू शकतात. तर भाजप प्रणित महायुतीला 19 ते 21 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. 2 जागा इतर पक्ष जिंकतील, असे अंदाज या सर्व्हेच्या निष्कर्षातून व्यक्त करण्यात आले आहेत.

    follow whatsapp