Eknath Shinde: नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. पण तो नेता नेमका कोण? याबाबत गेल्या काही दिवसांपासून तिढा कायम आहे. त्यावरच नेमका तोडगा काढण्यासाठी आज (28 नोव्हेंबर) रात्री उशिरा भाजपचे गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक पार पाडली. ज्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे हजर होते. याच बैठकीचा एक फोटो समोर आला ज्यावरून आता वेगवेगळे कयास लावले जात आहे. (maharashtra new cm devendra fadnavis has a smile on his face but eknath shinde face is expressionless photos from the meeting with amit shah surfaced)
ADVERTISEMENT
अमित शाह यांच्यासोबत तीनही नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक पार पडली. ज्यामध्ये मुख्यमंत्री पदासह मंत्रिपदं आणि खाती यावर बरीच चर्चा झाली. पण याच बैठकीआधी तीनही नेत्यांनी अमित शाह यांचं स्वागत केलं. ज्याचा फोटो हा समोर आला. ज्यावरून नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
हे ही वाचा>> Maharashtra New CM LIVE: मुख्यमंत्री ठरवणारी बैठक सुरू, अमित शाह घेणार फायनल निर्णय
'त्या' फोटोमधलं नेमकं गुपित काय?
अमित शाहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यानचे जे दोन फोटो समोर आले आहेत त्यापैकी पहिल्या फोटोत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शाह स्वागत करत असल्याचं पाहायला मिळालं. तर दुसऱ्या फोटोमध्ये अजित पवार हे अमित शाहांचं स्वागत करत होते. या फोटोमध्ये अमित शाह, अजित पवार यांच्यासह जेपी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे असल्याचं दिसून आलं.
पहिला फोटो: या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीसा हे अमित शाह यांना फुलांचा गुच्छ देत त्यांचं स्वागत करत आहेत. तर एकनाथ शिंदे हे यावेळी शाहांच्या बाजूला उभे आहेत. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे स्मितहास्य करताना दिसत आहे. त्यांचं हेच हास्य बरंच काही सांगून जात असल्याचं आता बोललं जात आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर अमित शाह हे शिक्कामोर्तब करू शकतात अशी जोरदार चर्चा आहे.
हे ही वाचा>> Milind Narvekar : शिवसेना ठाकरे गट मविआतून बाहेर पडणार? मिलिंद नार्वेकरांच्या 'त्या' ट्वीटमुळं खळबळ
दुसरीकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवणारे एकनाथ शिंदे हे मात्र काहीसे शांत असल्याचं दिसतं आहे. या फोटोमध्ये त्यांचा चेहराही निर्विकार दिसत आहे. त्यामुळे अशीही चर्चा आहे की, सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद भूषवण्याची शिंदेंची संधी ही हुकलेली असू शकते.
दुसरा फोटो: दुसऱ्या फोटोत अजित पवार हे अमित शाह यांना फुलांचा गुच्छ आणि शाल देऊन स्वागत करताना दिसत आहेत. या फोटोमध्येही अमित शाह, अजित पवार, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे हे खुलेपणाने स्मितहास्य करताना दिसत आहेत.
पण या फोटोमध्ये देखील एकनाथ शिंदे यांचं चित्त अत्यंत शांत आहे. इथेही त्यांचा चेहरा हा पूर्णपणे निर्विकार असल्याचं दिसून येतंय.
आता या दोन्ही फोटोवरून असंही बोललं जात आहे की, एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेला निर्णय हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला नसावा.
दरम्यान, अमित शाह यांनी नेमका कोणता निर्णय घेतलाय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागू शकते.
ADVERTISEMENT