Manoj Jarange-Patil: ‘आता वळवळ करायची नाही.. डावच उधळलाय’, जरांगे संतापले!

रोहित गोळे

• 10:49 AM • 21 Oct 2023

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी 40 दिवसानंतर सरकारला एक तासाचाही वेळ देणार नाही. असा इशाराच मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. पाहा जरांगे नेमकं काय म्हणाले.

maratha morcha akluj public meeting after 40 days we will not give even an hour to government manoj jarange patil warning to shinde fadnavis government regarding maratha reservation

maratha morcha akluj public meeting after 40 days we will not give even an hour to government manoj jarange patil warning to shinde fadnavis government regarding maratha reservation

follow google news

Manoj Jarange-Patil Maratha Reservation:अकलूज: मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांची आज (21 ऑक्टोबर) अकलूज (Akluj) येथे जाहीर सभा पार पडली. ज्यावेळी जरांगे-पाटील हे काहीसे संतापलेले दिसून आले. ‘सरकारने महिन्याभराचा वेळ मागितला होता आरक्षणासाठी पण आपण त्यांना 40 दिवस दिले. पण यापुढे सरकारने वळवळ करायची नाही. यापुढे 1 तासाचाही वेळ मिळणार नाही.’ असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारला इशाराच दिला आहे. पाहा अकलूजच्या सभेत जरांगे-पाटील नेमकं काय म्हणाले. (maratha morcha akluj public meeting after 40 days we will not give even an hour to government manoj jarange patil warning to shinde fadnavis government regarding maratha reservation)

हे वाचलं का?

‘आता वळवळ करायची नाही…’

‘सरकारने आपल्याकडून वेळ घेतलाय.. सावध राहा.. आपण वेळ दिलेला नाही. आपण चार दिवसाचा वेळ दिला होता. मी माझ्या जातीच्या, समाजाच्या वेदना मांडतोय. आपले 4 दिवस ठरले होते का? त्यानंतर त्यांनी 1 महिना मागितला.. आपण त्यांना 1 महिना दिला. 10 दिवस जास्त दिले. मराठ्यांनी मोठं मन दाखवलं. सरकारचा मान-सन्मान केलाय 40 दिवस देऊन. आता वळवळ करायची नाही सरकारने, 1 दिवस द्या अन् दोन दिवस द्या.. एक घंटा सुद्धा मिळणार नाही.’ असा इशारा जरांगेंनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Politics: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे थेट ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंसोबत दीड तास खलबतं!

‘सरकारचा डावच आपण उधळून लावला…’

जरांगे पुढे म्हणाले की, ‘त्यांची मुंबईत बैठक झाली.. सत्ताधारी आणि सगळ्या पक्षाची मिळून एक बैठक झाली आणि त्यांनी एक ठराव पारित केला. तुमच्या मागणीप्रमाणे टिकणारं आरक्षण देतो.. पण एक महिन्याचा वेळ द्या. मग आम्ही सावध झालो.. मराठा समाजाची बैठक द्या. त्यांना विचारलं की, 1 महिन्याचा वेळ द्यायचा का.. मराठे त्यांच्याही पुढे चार पावलं आहेत.. मराठे म्हणाले 40 वर्ष गेले आहेत जाऊ द्या.. द्या एक महिना..’

‘ते आपल्याला येडपट समजतात.. त्यांना आपल्या डोक्यावर खापर फोडायचं होतं. कसं फोडायचं होतं ते पण सांगतो. आपण चार दिवसांपेक्षा जास्त वेळ द्यायला तयार नव्हतो. ते एक महिन्याचा वेळ मागत होते. ते मनात असं धरून आले होते की, हे वेळ देणार नाही. आपण एक महिना म्हणायचा.. उद्या कायदा जर पारित केला 3-4 दिवसात.. आणि ते जर टिकलं नाही तर म्हणायचं की, तुम्हीच वेळ दिला नाही म्हणून आम्ही तुम्हाला टिकणारं आरक्षण देऊ शकलो नाही. म्हणजे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फोडायचं. तो पण डाव आपण उधळून लावला.’

हे ही वाचा >> Gaganyaan : इस्रोने रचला इतिहास, गगनयानच्या क्रू मॉड्यूलची यशस्वी चाचणी!

‘त्यांना येऊन दिलं.. तोवर मराठ्याची बैठक झाली.. ते आले बसले अन् म्हणाले एक महिन्याचा वेळ द्या. आम्ही म्हणालो 40 दिवस घ्या. ते फुल्ल टेन्शनमध्ये आले.. त्यांना वाटलं पहिल्यांदा 4 दिवस नाही म्हणत होते आणि आता 40 दिवस म्हणलेच कसे?’ असं म्हणत जरांगे पाटलांनी त्यांची नेमकी व्यूहरचना काय होती हे स्पष्ट केलं.

मात्र, आता 40 दिवसानंतर जर आरक्षण मिळालं नाही तर जरांगे-पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp