Maratha Reservation : क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली! CM शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन, ‘वकिलांची फौज…’

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सुप्रीम कोर्टात बाबी मांडू आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

mumbaitak

mumbaitak

प्रशांत गोमाणे

• 06:10 PM • 23 Dec 2023

follow google news

CM Eknath Shinde Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली आहे. त्यामुळे आता या क्युरेटिव्ह याचिकेवर येत्या 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहेत. या सुनावणीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत मराठा आरक्षणासाठीचा मास्टरप्लॅनही सांगितला आहे. (maratha reservation cm eknath shinde reaction on supreme court approves curative petition)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या क्युरेटिव्ह याचिकेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला सुप्रीम कोर्ट ऐकणार आहे. सुप्रीम कोर्टात वकिलांची फौज त्रुटी दूर करण्याचं काम करेल. मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी मागच्या सरकारनं पुरावे मांडले नव्हते. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सुप्रीम कोर्टात बाबी मांडू आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. याचसोबत सुप्रीम कोर्टात हे प्रकरण असताना इतरांनी शांतता आणि संयम बाळगला पाहिजे, असा ,सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना दिला आहे.

हे ही वाचा : Solapur Accident : तरूणी कॉलेजला निघाली, ती परतलीच नाही; सोलापूरात काय घडलं?

चार न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर येत्या 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. चार न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने आता 24 जानेवारीला या प्रकरणावर विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, न्यायमूर्ती संजय किशन कौल 25 डिसेंबरला निवृत्त होत आहेत. हे शक्य आहे की सीजेआय त्यांच्या जागी आणखी एका न्यायाधीशाचा खंडपीठात समावेश करू शकतात.

हे ही वाचा : Hardik Pandya : मुंबई इंडियन्सला मोठा झटका, कर्णधार हार्दिक पांड्या IPL मधून होणार बाहेर

विनोद पाटील काय म्हणाले?

क्युरेटीव्ह याचिकेवर मा. न्यायालयाने भाष्य केले आहे. येत्या 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने क्युरेटीव्ह याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. याचा अर्थ असा क्युरेटीव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने नाकारली नाही. तर सुप्रीम कोर्टाने स्विकारलेली आहे. यामुळे मला विश्वास आहे,लवकरात लवकर यावर सुनावणी होईल आणि मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे, असा दावा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.

    follow whatsapp