Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : बीड: मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये घेतलेल्या इशारा सभेत मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तुफान टीका केली. या सभेत छगन भुजबळांवर बोलताना मनोज जरांगेंनी अनेकदा पातळी सोडून विधानं केली. (maratha reservation manoj jarange patil made controversial statements about minister chhagan bhujbal while speaking in a public meeting in beed)
ADVERTISEMENT
छगन भुजबळांबाबत मनोज जरांगेंची वादग्रस्त विधानं…
कोणी म्हणतं आमची घरं जाळली, हॉटेल जाळली.. आमच्यावर खोटा डाग लावलाय. यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप मराठे गुंतवले. जर मराठ्यांना काही करायचं असतं तर केलं असतं की नसतं? मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. सरकार झोपू नका.. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. विनाकारण त्याला डाग लावू नका..
ते कधी जाळपोळ करू शकत नाही.. यांची यांनीच जाळपोळ केली रे.. उगाच आमच्या गोरगरिबांची नावं घेतली. ते येवल्याचं येडपट.. बावचाळलेलं, त्याच्या पाव्हण्याचं हॉटेल त्यानीच जाळले आणि नावं आमच्या पोरांचं घेतंय. त्याचंच ऐकतंय सरकार हे..
तो तर सांगतो बघा-बघा मला कशा शिव्या देतात.. कशाला बोलतो रे मग? कशाला मराठ्यांचा वाटेला जातो.. काही दिवसांनी तुटलेल्या चपला, केळ्याची सालं तुझ्याजवळच दिसणार.. तू थांब थोडं.. तुला म्हटलं होतं माझ्या नादी लागू नको.. मी लय नमुना बेकार आहे..
आता कसं बारीक आवाजात बोलतो.. जसं काय कळ निघतंय त्याला.. जरांगे साहेब म्हणतोय आता.. पहिल्यांदा नीट राहिला असतं तर जमलं नसतं का.. दिसतंय पण कसं.. रंग बदलणारा.. रंग्या.. गप्प मरायचं ना..
मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरांगे-पाटील तुम्ही बोलू नका.. मी त्याला समज दिली.. मी गप्प बसलो म्हटलो म्हाताऱ्याला कशाला बोलायचं. मी चार दिवस काही बोललो का?
मग काल… हळूच बारीक आवाजात बोलतो.. द्या त्यांना सगळंच.. बंगले बांधा त्यांच्यापाशी.. येडपट, बुजगावणं कुठचं.. माझी शाळा काढतो.. कसं केलं याला मंत्री.. महाराष्ट्राला कलंक आहे.. डबडं.. तू थांब एकदा.. आरक्षण मिळू दे मग तुला कचकाच दाखवतो.. तुझी खूप दिवसांपासून फडफड सुरू आहे.
आम्ही गप्प बसलो की, काड्या करतो.. मग तो सुरू करतो.. मी चवताळलो की, मला नाही निघत दम.. मी ओरिजनल मराठ्यांची औलाद आहे.. दम नसतो काढत..
हे ही वाचा>> Manoj Jarange: ‘..मग तुला कचकाच दाखवतो, तुझी फडफड..’, जरांगेंनी कोणाचा केला एकेरी उल्लेख?
अशी थेट विधानं मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत केलं आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ हे नेमकं काय उत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच ओबीसी आरक्षणाशी संबंधित आपली राजकीय भूमिका भुजबळ कशाप्रकारे घेतात याकडेही सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT