CM Eknath Shinde Maratha Reservation: मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मनोज जरांगे यांना नियंत्रणात आणण्यासाठी शिंदे सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त शब्द वापरणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविरोधात SIT ची स्थापन करण्यात आलेली असताना आता पुन्हा एकदा CM शिंदेंनी मनोज जरांगे यांना आंदोलनाची काही गरज नाही असं ठणकावून सांगितलं आहे. (maratha reservation there is no need to protest now cm shinde clearly told manoj jarange)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'तुम्हाला आंदोलन करण्याची गरजच नाही...'
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (27 फेब्रुवारी) अंतरिम बजेट सादर करण्यात आलं. ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याचवेळी त्यांना मनोज जरांगे यांच्याशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
'राज्य सरकारने मराठा जे देय आरक्षण होतं.. टिकणारं, कायद्याच्या चौकटीत टिकणारं.. ते दिलेलं आहे 10 टक्के.. कुणबी प्रमाणपत्र नोंदी ज्या जुन्या आहेत त्या देखील शोधून देण्याच काम सुरू आहे. मराठा समाजाला ज्या-ज्या सुविधा पाहिजेत त्या-त्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता.. हे आम्ही वारंवार सांगतोय.'
'सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे.. कालही स्पष्ट होती, उद्याही भूमिका स्पष्ट राहील. कारण मराठा समाजाला आतापर्यंत ज्यांना-ज्यांना संधी होती त्यांनी ती संधी दवडली. मराठा समाजाला न्याय दिला नाही.'
हे ही वाचा>> Live : 'आई-बहिणीवरून अपशब्द वापरले...', मनोज जरांगेंनी मागितली माफी!
'मराठा समाजावर अनेक लोक हे राजकीयदृष्ट्या खूप मोठे झाले. पण मराठा समाज वंचित राहिला. पण याच मराठा समाजाला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा आरक्षण देण्याचा निर्णय झाला. हायकोर्टामध्ये ते टिकवलं. दुर्दैवाने सरकार बदलल्यावर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही.'
'मात्र, आम्ही यावेळेस आरक्षण देताना सुप्रीम कोर्टाने जे-जे निरिक्षण, त्रुटी नोंदवल्या आहेत. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास कसा आहे हे सगळं पटवून त्याचा सर्व्हे केला आहे. फक्त सॅम्पल सर्व्हे नाही तर संपूर्ण सर्व्हे केला आहे. 4 लाख लोकं काम करत होते.'
'हे आरक्षण टिकणारं आहे. विरोधकांना देखील सांगू इच्छितो की, आताच आरक्षण दिलं आहे. आताच जीआर काढला आहे. तुम्ही आताच म्हणता की, आरक्षण टिकणार नाही.. का टिकणार नाही? याची कारणं तरी द्या.. आणि का टिकणार याची कारणं आमच्याकडे आहेत. त्यामुळे मला वाटतं आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन कशासाठी केलं होतं? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी.. ते तर सरकारने दिलेलं आहे.'
हे ही वाचा>> Manoj Jarange : "फडणवीसलाच जेलमध्ये टाकावं लागेल"
'सरकार प्रत्येक गोष्ट करते आहे.. मला वाटतं हे आंदोलन करण्याची आवश्यकता करण्याची गरज कोणालाही नाही.. अशाप्रकारचं काम राज्य सरकारने केलं आहे.' अस म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना आता आंदोलन करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT