Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ज्या प्रकारे जरांगे पाटलांच्या सभा होत आहेत, त्याच प्रमाणे मंत्री छगन भुजबळ यांच्याही वेगवेगळ्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभेतून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांच्यावर निशाण साधला आहे. आजही भिवंडीतील आरक्षण बचाव सभेतून भुजबळांनी त्यांच्यावर सडकून टीका करत बेवड्या म्हणत त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर टीका ओबीसी (OBC) बांधवांना जाहीर आवाहन करत येणाऱ्या निवडणुकीत ओबीसींविरोधात जे बोलतात त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय राहू नका असं आवाहनही छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
ADVERTISEMENT
त्यांना द्या आणि आम्हालाही द्या
मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी छगन भुजबळ यांनी आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र ज्या प्रकारे झुंडशाही चालू आहे. त्याला आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रमाणे मराठा समाजाला देता त्याच प्रमाणे आम्हालाही द्या. कारण त्यांना हजारो कोटीमध्ये योजना मिळतात मात्र ओबीसींच्या वाटेला काय येत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे ते म्हणाले जसं त्यांना द्या तसेच आम्हालाही द्या अशा शब्दात त्यांनी सरकारसह जरांगे पाटलांचा समाचार घेतला.
छगन भुजबळ एकटा खातोय
ओबीसींचं आरक्षण छगन भुजबळ एकटा खातोय अशी टीका मनोज जरांगे पाटील माझ्यावर करतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. छगन भुजबळ एकटा खातोय असं हा जरांगे म्हणतोय पण त्याला मराठा समाजासाठी सरकार काय काय करते हे माहिती आहे का असा सवाल त्यांनी त्यांना केला आहे. त्यामुळे टीका करताना जरा विचार करून बोलत जा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
हे ही वाचा >> NCP : सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार, मराठा आरक्षणावरील आरोपांवर काय म्हणाल्या?
तू खातोस ना सासरच्या घरचं
मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आपल्यावर हा भुजबळ एकटा खातोय अशी टीका जरांगे करतोय अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला. तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी एकेरी शब्दाचा उल्लेख करत तू खातोस ना सासरच्या घरचं म्हणत त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला
मराठा विरुद्ध ओबीसी हा लढा तीव्र होताना आता दिसून येऊ लागला आहे. कारण छगन भुजबळ यांच्या भाषणातून आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर टीका करताना दारूच्या वाक्प्रचारावरून त्यांनी टीका केली आहे. जरांगेंचा उल्लेख करत आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला अशा शब्दात त्यांची त्यांनी खिल्ली उडवली आहे. बेवड्या तू तुझी तब्बेत सांभाळ असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे आता आणखी हा वाद चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
जरांगेला सांगा हे चूक
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जाणारी दादागिरी, मराठा आरक्षणासाठी चाललेली दादागिरी ही चूक आहे. कारण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मागणं ही चूक आहे हे जरांगेंना कुणीतरी सांगा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. आज पुन्हा एकदा लायकी आणि जरांगेंच्या एकेरी उल्लेखामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT