Raj Thackeray : "तो सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही", लोकप्रिय अभिनेत्याला इशारा

मुंबई तक

22 Sep 2024 (अपडेटेड: 22 Sep 2024, 11:07 AM)

Raj Thackeray Tweet On Fawad Khan Movie : हिंदी चित्रपटसृष्टीत वादग्रस्त सिनेमाची निर्मिती झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सिनेमाच्या टीमला दणका दिला जातो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी अभिनेत्यांची तर भारतातून हकालपट्टीच केली आहे.

राज ठाकरे यांनी हिंगोली विधानसभा निवडणुकीसाठी 5 वा उमेदवार घोषित केला आहे. विधान सभा निवडणूक, प्रमोद कुट्टे, हिंगोली विधानसभा निवडणूक, मनसे राज ठाकरे, महाराष्ट्राचे राजकारण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

'हा' चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा रोष कुणावर?

point

'त्या' अभिनेत्याच्या चित्रपटाचं नाव काय?

point

राज ठाकरेंची ट्वीटर पोस्ट होतेय व्हायरल

Raj Thackeray Tweet On Fawad Khan Movie : हिंदी चित्रपटसृष्टीत वादग्रस्त सिनेमाची निर्मिती झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सिनेमाच्या टीमला दणका दिला जातो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी अभिनेत्यांची तर भारतातून हकालपट्टीच केली आहे. अशातच आता पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी या चित्रपटाबाबत मोठं ट्वीट केलं आहे. 'हा सिनेमा महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थिती प्रदर्शीत होऊ देणार नाही', असा इशारा ठाकरेंनी दिला आहे. (Maharashtra Navnirman Sena gives Warning To Pakistani Actor Fawad Khan. MNS President Raj Thackeray has criticized Pakistani actors, Tweet Goes Viral)

हे वाचलं का?

राज ठाकरे ट्वीटरवर काय म्हणाले?

''फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा >> Gold Rate Today: सोनं घ्या सोनं! पण एकदा भाव तर वाचा, 'या' 15 शहरांना बसला महागाईचा चटका

महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे. अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे.

हे ही वाचा >> Car Accident : कंटेनरने धडक दिल्याने कारचा चक्काचूर! चार जण जागीच ठार, 'ती' चूक जीवावर बेतली

अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे."

    follow whatsapp