Mumbai Assembly Election 2024 Full Schedule: महाराष्ट्राचा महासंग्राम... मुंबई-कोकणात 'या' तारखेला होणार मतदान

मुंबई तक

15 Oct 2024 (अपडेटेड: 15 Oct 2024, 05:27 PM)

Mumbai Assembly Election 2024 Full Schedule: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारखा जाहीर झाल्या असून मुंबई आणि कोकणात ... या तारखेला मतदान पार पडणार आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती.

Mumbai Assembly Election 2024 date

Mumbai Assembly Election 2024 date

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

point

मुंबई कोणत्या तारखेला निवडणूक होणार?

point

केंद्रीय निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

Mumbai Assembly Election 2024 Full Schedule: Date, Voting and Results: नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (15 ऑक्टोबर) राजधानी दिलेल्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित केली. 20 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्रातील विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर 2024 ला या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. ही विधानसभा निवडणूक एका टप्प्यात होणार असून सर्वात महत्वाचा विभाग असलेल्या मुंबईत 20 नोव्हेंबरला मतदान घेतलं जाणार आहे. (mumbai assembly election 2024 full schedule date voting and Results in marathi on which date will polling be held in mumbai)

हे वाचलं का?

या निवडणुकीत मुंबईकर नेमकं कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहे. अशावेळी मुंबईत नेमकं कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार? याबाबात राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा करून निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला होता. 

हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : निवडणुकांची रणधुमाळी, महायुती लोकसभेचा वचपा काढणार?

Click here for Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Full Schedules:

मुंबईतील निवडणूक कार्यक्रमाविषयी महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम-

अधिसूचना जारी होण्याची तारीख- २२ ऑक्टोबर २०२४
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- २९ ऑक्टोबर २०२४
अर्ज छाननीचा दिवस- ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- ०४ नोव्हेंबर २०२४
मतदानाचा दिवस- २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणीची तारिख- २३ नोव्हेंबर २०२४

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या महत्त्वाच्या विभागात विधानसभेची निवडणूक कधी होणार याची माहितीही देण्यात आली आहे.

    follow whatsapp