Chhagan Bhujbal On Dhananjay Munde: "मला मंत्री व्हायचंय म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं, असं माझ्या मनात, स्वप्नातही येणं शक्य नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की, मीडियात ऐकतोय की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. मला सांगायचंय की, फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्यामध्ये जर कुणी दोषी सापडलं, जे जे कोणी दोषी सापडतील, लहान-मोठे आका..काका जे कोणी असतील ते..त्या सर्वांवर कारवाई करू", असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीवर बोलताना केलं आहे.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
"धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरुय, दुसरीकडे अशीही चर्चा सुरु आहे की, मुंडेंनी राजीनामा दिल्यावर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, मला मंत्री व्हायचंय म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं, असं माझ्या मनात, स्वप्नातही येणं शक्य नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की, मीडियात ऐकतोय की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. मला सांगायचंय की, फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्यामध्ये जर कुणी दोषी सापडलं, जे जे कोणी दोषी सापडतील, लहान-मोठे आका..काका जे कोणी असतील ते..त्या सर्वांवर कारवाई करू. परंतु, त्याआधी आपण मुंडेंचा राजीनामा का मागत आहोत? असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला.
हे ही वाचा >> Chandrashekar Bawankule: "मोदींवर बोलण्याची लायकी...", चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
. "चौकशीतून काही बाहेर आलंय का तसं, तुमच्याकडे जर तशी माहिती असेल, तर तुम्ही ती पोलिसांना द्या. ते चौकशी करतील. त्यांचा हात यामागे आहे, हे कन्फर्म होत नाही. तोपर्यंत त्यांनीका राजीनामा द्यावा. मला हे योग्य वाटत नाही. कारण मी सुद्धा अशा एका प्रकरणातून गेलो आहे. 2003 मध्ये तेलगीला मकोका लावला. त्याला मी पकडलं. सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्यावर माझा राजीनामा घ्यायला लागला. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. शेवटी मीच सुप्रीम कोर्टात गेलो.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचं भिवंडी कनेक्शन आहे तरी काय?
प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस इथून सीबीआयला नेली. त्यावेळी वाजपेयी साहेबांचं बीजेपी सरकार होतं. सीबीआयने आमची पूर्ण चौकशी केली. सगळ्या फायली तपासल्या. प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांनी सांगितलं तुमचा यात काहीही दोष नाही, तुम्ही केलेली कार्यवाही योग्य आहे. माझं नाव सुद्धा चार्जशिटमध्ये कुठे आलं नाही. परंतु, उपमुख्यमंत्रीपद गेलं, होम मिनिस्टरपद गेलं. कारण नसताना एक डाग लागला. मनस्ताप झाला. त्यानंतर 2004 मध्ये येवल्यातून पुन्हा निवडून आलो आणि मला मंत्री केलं. मी ते भोगलेलं आहे", असंही भुजबळ म्हणाले.
ADVERTISEMENT
