Lok sabha Election 2024: संभाजीनगरमध्ये गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सभेमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी 'जिंदगी के रंगमंच पर कुछ इस तरह निभाए किरदार, पर्दा गिर चुका है, तालिए फिरभी गुंज रही है' असं म्हणत त्यांनी आपल्या वडिलांची आठवण काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल गौरवोद्गगार काढले.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र कमी पडणार नाही
पंकजा मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेत बोलताना महाराष्ट्रातून अमित शाह जेवढे प्रयत्न करत आहेत. ते महाराष्ट्रातून कुठेही कमी पडणार नाहीत हा विश्वास महाराष्ट्रातील नेत्यांनी या क्षणी दिला पाहिजे अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मोदींमुळे आशेची स्वप्नं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाविषयी बोलताना त्यांनी जेव्हा या देशाला सगळ्यात जास्त गरज होती. त्यावेळी येथील गरीबांच्या स्वप्नांना ठिगळं लावण्याची गरज होती. एका गरीबाला खुल्या अस्मानातून पक्क्या घरात पोहचण्याची गरज होती, माता भगिनींच्या डोळ्यातील पाणी ज्यावेळी नळामध्ये आणण्याची गरज होती त्याच वेळी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि लोकांच्या मनात आशेची स्वप्न निर्माण झाली असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रामराज्य आलं
देशाचं 2047 चं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर पायाभरणी ही पक्की करावी लागणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे तंबूमध्ये असणाऱ्या रामाला आता मंदिरामध्ये घेऊन जाण्याचं यश आले हे नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळालं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
अमितभाईंना त्रास नाही
पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीविषयी अमित शाह यांना विश्वास देताना सांगितले की, येथील नेत्यांनी आणि लोकांनी आता अमित शाह यांना महाराष्ट्रातून त्रास कमी होणार हा विश्वास आता आम्ही आता दिला पाहिजे असंही पंकजा मुंडे यांनी विश्वासाने सांगितले.
ADVERTISEMENT